1 अरुणोदय सिंगचा घटस्फोट २०१९ मध्ये झाला.
2 त्याच्या घटस्फोटाचं मुख्य कारण कुत्र्यामुळे होणारी सततची भांडणं होती.
3 त्याची पत्नी कॅनडाची योगा शिक्षिका ली एल्टन होती.
बॉलिवूडमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. सेलिब्रिटीच्या वयक्तिक आयुष्यात अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा मोठ्या वादाचा कारण ठरतात. कधी कधीतर त्या वादाचं रुप इतकं होतं की प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. असच काहीसं प्रकरण बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडलय. कोणत्या वादामुळे नाहीतर चक्क एका कुत्र्यामुळे दोघांचा घटस्फोट झालाय.
अभिनेता अरुणोदय सिंग याच्यासोबत हा प्रकार घडलाय. अरुणोदयने जिस्म २, ब्लॅकमेल, अपहरण सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. तसंच तो मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचा नातू आहे. परंतु तो त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे खुप चर्चेत असतो. परंतु त्याची सगळ्यात जास्त चर्चा रंगलेली ती त्याच्या घटस्फोटाची.
अरुणोदय सिंगने एका परदेशी मुलीसोबत लग्न केलं होतं. गोव्यात एका ट्रिप दरम्यान अरुणोदयची कॅनडामध्ये राहणाऱ्या ली एल्टनसोबत भेट झाली होती. दोघांनी त्यानंतर एकमेकांना ३ वर्ष डेट केलं. मोठ्या थाटामाटात त्याचा लग्नसोहळा पार पडला. त्याची पुर्वाश्रमीची पत्नी व्यवसायाने योगा शिक्षिका होती. अभिनेत्याचं आणि तिचं लाईफस्टाईल पुर्ण वेगळं होतं.
View this post on InstagramA post shared by Arunoday Singh (@sufisoul)
अरुणोदयला कुत्र्यावर प्रचंड प्रेम होतं. परंतु त्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीला कुत्र्याचं वागणं, भुकणं हे सहन होत नव्हतं. कुत्र्यावरुन होणारी छोटी छोटी भाडणं मोठी होऊ लागली. शेवटी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचलं. 2019 मध्ये हे जोडपं कुत्र्यामुळे वेगळं झालं.
FAQs
अरुणोदय सिंग कोण आहे?
अरुणोदय सिंग हा बॉलिवूड अभिनेता असून माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचा नातू आहे.
अरुणोदय सिंगच्या घटस्फोटाचं कारण काय होतं?
त्याच्या पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या सततच्या भांडणांमुळे घटस्फोट झाला.
त्याची पत्नी कोण होती?
त्याची पत्नी कॅनडाची ली एल्टन होती, जी व्यवसायाने योगा शिक्षिका आहे.
हे जोडपं कधी वेगळं झालं?
२०१९ मध्ये अरुणोदय सिंग आणि ली एल्टन यांनी घटस्फोट घेतला.
तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल