सोमाटणे, ता. १० : सोमाटणे गावातील स्वराच्या किक बॉक्सिंगमधील यशाला आणखी एक मोठी भर पडली आहे. स्वरा मुऱ्हे हिची येत्या १४ सप्टेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या ‘अस्मिता खेलो इंडिया’ किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्वरा ही ‘आरिंजय मार्शल आर्ट स्पोर्ट्स फाउंडेशन’ या संस्थेच्या सोमाटणे शाखेत प्रशिक्षण घेत आहे. तिला प्रशिक्षक संदीप माने, यशवंत माने आणि अथर्व कावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रविवारी गोव्यात झालेल्या बेल्ट ग्रेडेशन निवड चाचणीत तिने ब्राऊन बेल्टसाठी झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मावळ तालुक्यातून ही स्पर्धा जिंकणारी स्वरा एकमेव विद्यार्थीनी ठरली. या यशामुळेच तिची साताऱ्यातील स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही तिने तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
गोवा ः ब्राऊन बेल्टसाठीच्या निवड चाचणीतील विजयी स्पर्धक स्वारा मुऱ्हे.
४८१८१