सुंदर, निरोगी त्वचेसाठी आपण महागडी उत्पादने वापरतो. कधी कधी ही उत्पादने आपल्याला स्किनला सूट न झाल्यामुळे लालसरपणा, संसर्गाचा त्रास होतो. मग अशा वेळी एक घटक असा आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा अत्यंत निरोगी, चमकदार आणि मऊ बनवू शकता. निरोगी त्वचेसाठी तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसतील. होय, कारण तांदळाचे पीठ हे त्वचेसाठी एखाद्या टॉनिकसारखे आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. तुम्ही तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता.
त्वचेसाठी तांदळाच्या पीठाचे फायदे:
- आयुर्वेदात तांदळाचे पीठ हे त्वचेसाठी उपयुक्त मानले जाते. कारण तांदळात व्हिटॅमिन बी, फेरुलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेला योग्य ते पोषण मिळते.
- डेड स्किनची समस्या दूर करण्यासाठीही तांदळाचे पीठ रामबाण उपाय मानला जातो. तसेच यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
- यासोबतच, तांदळाच्या पिठात असलेले स्टार्च चेहऱ्याला थंडावा देतात, ज्यामुळे लालसरपणा, जळजळ आणि सूज कमी होते.
- तसेच तांदळाच्या पिठात अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.
तांदळाच्या पिठाचा फेस पॅक:
- तांदळाचा फेस पॅक तयार करण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा बटाट्याची पेस्ट, एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा.
- ही पेस्ट मान व चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
तांदळाच्या पिठाचे स्क्रब:
- तुमची त्वचा तेलकट असल्यास दही आणि तांदळा स्क्रब प्रभावी उपाय ठरू शकतो. यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ, तीन चमचे दही, अर्धा चमचा कोरफड जेल मिक्स करा.
- पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर चार ते पाच मिनिटे हलका मसाज करावा. काही मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.