कुलदीप यादवला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डावललं जाणार! असं भाकीत वर्तवण्याचं कारण काय?
GH News September 11, 2025 08:53 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. 14 सप्टेंबरला हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा आहे. दोन्ही बाजूच्या क्रीडाप्रेमींना पराभव पचवणं कठीण जातं. त्यामुळे विजयाचं दडपण दोन्ही संघावर असणार आहे. यासाठी दोन्ही संघ एका मजबूत प्लेइंग 11 सह मैदानात उतरतील. मात्र टीम इंडियाची प्लेइंग 11 मैदानात उतरण्यापूर्वीच माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भाकीत वर्तवलं आहे. खरं तर हा टोमणा मारला आहे. पण त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संजय मांजरेकर यांनी ट्वीट करताना लिहिलं की, युएईविरुद्धच्या सामन्यात एका षटकात 3 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादव कदाचित पुढच्या सामन्यात खेळणार नाही. संजय मांजरेकर यांनी क्रिप्टीक पोस्ट करत क्रीडाप्रेमींना संभ्रमात टाकलं आहे.

संजय मांजरेकर यांनी ही पोस्ट करत संघ व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. कुलदीप यादवने 2017 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याला संघातून वारंवार डावलण्यात आलं. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळेच संजय मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला असावा. कारण त्यांनी केलेल्या पोस्टपुढे एक मजेशीर इमोजी टाकला आहे. त्यांनी या माध्यमातून संघ व्यवस्थापनावर बोचरी टीका केल्याचं चर्चा रंगली आहे.

कुलदीप यादवने युएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2.1 षटकात 7 धावा देत 4 गडी बाद केले. यापैकी 3 गडी त्याने दुसऱ्याच षटकात घेतले होते. त्यामुळे त्याचं संघातील स्थान पक्कं मानलं जात आहे. पण संजय मांजरेकरांच्या ट्वीटमुळे कुलदीप यादवच्या चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण यापूर्वी असं झालं आहे. 2019 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी 5 विकेट घेतल्यानंतर वगळण्यात आलं होतं. 2021 मध्ये फक्त एक कसोटी सामना खेळला. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये संधी मिळाली. बांगलादेशविरुद्ध 5 विकेट घेतल्या. पण नंतर डावललं गेलं. 2024 मध्ये कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली. पण ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत बेंचवरच बसला. टी20 वर्ल्डकप 2024 साखळी फेरीत खेळवलं नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.