अक्षय शिंदे
जालना : वाळू माफियांची वाढलेली मुजोरी अजूनही कमी झालेली नाही. जालना जिल्ह्यात हि मुजोरी पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली असून कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला. दरम्यान तहसीलदारांनी देखील ४० किलोमीटरचा पाठलाग करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई केली आहे.
जालन्याच्या अंबडतालुक्यातील पारनेर तांडा ते कर्जत पर्यंत पाठलागाचा थरारक प्रसंग चालला आहे. दरम्यान नदीतून वाळूची वाहतूक करण्यास मनाई आहे. असे असताना देखील सर्रासपणे वाळू माफियांकडून नदीतून वाळूचे उत्खनन करत तस्करी केली जात आहे. अर्थात प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांची मुजोरी पाहण्यास मिळते. तर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ले करण्यात येत असल्याचे प्रकार घडत असून जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.
Maharashtra Politics: दसऱ्याला नव्या युतीची घोषणा? राज -उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, तातडीची बैठक बोलावलीअंबड तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ
अंबड तालुक्यात मागील काही दिवसापासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच असून सर्रासपणे बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने मागील काही दिवसापासून या विरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक कारवाया करत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. तर काल पुन्हा तहसीलदारांचे पथक कारवाईसाठी गेले होते.
Nanded : रस्त्याचे काम आडवत मायलेकाने घेतले विषारी औषध; राज्य महामार्गात १०० फूट जमीन जास्त घेतल्याचा आरोपअंगावर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न
अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार यातून थोडक्यात बचावले असून जवळपास ४० किलोमीटरचा पाठलाग करत हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील पारनेर तांडा ते कर्जत पर्यंत हा पाठलागाचा थरारक प्रसंग सुरू होता.