धक्कादायक! 'दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू'; तीन वर्षांनी डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा
esakal September 12, 2025 08:45 AM

सोलापूर : प्रसूतीसाठी माहेरी तांदुळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आलेल्या अमृता विजय माने हिला २२ ऑगस्ट २०२२ रोजी पोटात दुखू लागल्याने १०८ रुग्णवाहिकेतून रात्री साडेअकराला बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एलन मलिक तांबोळी व आरोग्य सेविका अर्चना सिद्राम तोडकर या दोघींच्या निष्काळजीपणामुळे अमृताचा मृत्यू झाला. तीन वर्षांनी दोघींविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पण, दाखल कलमानुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.

Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक

तांदुळवाडी येथील फिर्यादी दत्तात्रय राजेंद्र गाडेकर यांची मुलगी अमृता हिचा विवाह मरवडे (ता. मंगळवेढा) येथील दत्तात्रय माने यांच्यासमवेत झाला होता. अमृता ही प्रसुतीसाठी माहेरी आली होती. अचानक २२ ऑगस्ट २०२२ रोजी तिच्या पोटात दुखू लागले आणि तिच्या आई-वडिलांनी तातडीने १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यांनी अमृताला बोरामणी आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. सेविका अर्चना तोडकर यांनी अमृताला डिलिव्हरी वार्डात नेले आणि काहीवेळाने मुलगा झाल्याची वार्ता अमृताच्या आई-वडिलांना दिली. त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला, पण अमृताचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्याची माहिती त्यांनी सेविकेला दिली.

अमृता दुसऱ्या दिवशी चक्कर येऊन पडली व तिचे हातपाय वाकडे झाले होते. बोरामणी रुग्णालयातून अमृताला लगेच सिव्हिल हॉस्पिटलला आणले. त्याठिकाणी उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास अमृताचा मृत्यू झाला. बोरामणी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकेच्या हलगर्जीपणामुळे अमृताचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणात सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन हे प्रकरण मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात आले. त्यांच्या अहवालानंतर डॉ. ऐलन तांबोळी व सेविका अर्चना तोडकर यांच्याविरूद्ध सोलापूर तालुका पोलिसांत तीन वर्षांनी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक घोळवे तपास करीत आहेत.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा डॉ. एलन यांनी सोडला जॉब

प्रसुती दरम्यान दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे अमृताचा मृत्यू झाल्याची फिर्याद अमृताच्या वडिलांनी पोलिसांत दिली. पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत, पण डॉ. एलन यांनी नोकरी यापूर्वीच सोडली असून त्या सध्या सोलापुरात नाहीत. गुन्ह्यातील कलमांनुसार सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याने दोन्ही संशयितांना नोटीस बजावून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.