अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील बसस्थानक परिसरातील कोर्ट रोडवरील जवळपास चार दुकानात विजेचे शॉर्ट सर्किट झाल्याने दुकाना जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (ता.11) भल्या पहाटे अंबड शहरातील बसस्थानक परिसरातील कोर्ट रोडवरील पान सेंटर, लोंड्री, दोन हेअर सलूनच्या दुकानात विजेचे शॉर्ट सर्किट झाल्याने चार हि दुकाना जळून कोळसा झाला आहे.
यामुळे पान सेंटर मधील साहित्य, लोंड्री मधील कपडे, साहित्य तसेच हेअर सलून मधील साहित्य खुर्च्या, आरशे व इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. छोट्या व्यवसायिकांनी हाताला रोजगार मिळावा म्हणुन दुकाना किरायाने घेतल्या होत्या.अनेक तरुण यांनी हाताला रोजगार मिळावा. हाताला चार पैसे मिळावे.अशी अपेक्षा मनाशी बाळगून दुकानाचे मासिक भाडे,
डीपॉजिट देऊन मोठया अपेक्षेने रोजगार सुरू केला होता.मात्र भल्या पहाटे झालेल्या विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे होत्याचे नव्हते झाले. यामुळे छोट्या व्यवसायिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. हाताला चार पैशाचे उत्पन्न तर मिळालेच नाही. मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने व्यवसायिक अचानक झालेल्या नुकसानी मुळे पुरते हतबल झाले आहे.
शहरातील बसस्थानक परिसरातील कोर्ट रोडवर व्यवसायिक, नागरिकांनी जळालेल्या दुकाना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुकाना जळून कोळसा झाल्याने नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात आली.