swt111.jpg
90784
वेंगुर्लेः ज्येष्ठ सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या समवेत गोपाळ तेरेखोलकर, संतोष रेडकर.
वेंगुर्लेचा गोपाळ तेरेखोलकर
झळकणार ‘दशावतार’मध्ये
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ११ः कोकणच्या लोककलेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘दशावतार’ आता मराठी चित्रपटाच्या रुपाने रुपेरी पडद्यावर येणार आहे. या ‘दशावतार’ चित्रपटात तालुक्यातील भेंडमळा येथील सुपुत्र आणि दशावतारी कलाक्षेत्रातील खलनायक गोपाळ तेरेखोलकर याने भूमिका साकारली आहे. त्याला मिळालेल्या या संधीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण वालावल, वेतोरे, केळूस, धामापूर, सरमळ या भागात झाले असून यामध्ये ज्येष्ठ सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्यासारखे दिग्गज अभिनेते कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संजय लाड, संतोष रेडकर, दादा राणे-कोनस्कर, यश जळवी, गोपाळ तेरेखोलकर व ज्ञानेश्वर तांडेल या दशावतारी कलाकारांचाही समावेश आहे. आपल्यासाठी ही संधी अनपेक्षित असून, सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे साध्य झाल्याचे गोपाळ तेरेखोलकर आवर्जून सांगतो.
...
swt112.jpg
90786
निशांत शिरोडकर
शूटिंग, वेटलिफ्टिंग स्पर्धेत
निशांत शिरोडकर विजेता
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : शालेय शिक्षण क्रीडा व युवा संचलनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी निशांत शिरोडकर याने दुहेरी यश संपादन केले. त्याने रायफल शूटिंग आणि वेटलिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. वेंगुर्ले येथील उपरकर शूटिंग रेंजमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या रायफल शूटिंग (पीप साईट) स्पर्धेत निशांतने प्रथम क्रमांक मिळविला. या विजयामुळे त्याची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे. याआधी १९ ऑगस्टला ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत निशांतने ७९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला होता. वेटलिफ्टिंगमध्येही त्याची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. निशांत हा रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी कला शाखेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या दुहेरी यशाबद्दल प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, साईनाथ चव्हाण, चंद्रशेखर कुशे यांनी त्याचे अभिनंदन केले.
....................