कोल्हापूर-पुणे महामार्ग टोलमुक्त करण्याबाबत कोर्टात याचिका दाखल.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांकडून टोल आकारणीवर प्रश्नचिन्ह.
कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली.
सुनावणीनंतर हा महामार्ग टोलमुक्त होण्याची शक्यता वाढली आहे.
Kolhapur-Pune Highway may soon be toll-free : कोल्हापूर-पुणे महामार्ग हा लवकरच टोलमुक्त होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्टाकडून याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. झालं असं की, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-पुणे हा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याशिवाय टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्याबाबत कोर्टाने नोटीस बजावली आहे. जे रस्ते निकृष्ठ आणि खराब झाले असतील, त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे पुणे-कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी, अशी याचिकामाजी खासदार राजू यांनी कोल्हापूर खंडपीठात दाखल केली.
राजू शेट्टी यांच्या याचिकेची कोल्हापूरखंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या रस्त्याची दुरावस्था अतिशय भयानक झाली आहे. रस्ता दुरूस्त केला जात नाही, तरीही नागरिकांकडून टोल वसूल केला जात आहे. हा रस्ता लवकरात लवकर टोलमुक्त करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठात केली. राजू शेट्टी यांची याचिका कोल्हापूर खंडपीठाने गांभीर्याने घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस धाली आहे.
Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव यांच्यासोबतच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत कोल्हापूर सर्किट बेंचने नोटीसा पाठवल्या आहेत. दरम्यान, केरळमधील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यावर दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ऑगस्ट अखेरीस सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले होते. खराब रस्ते असताना टोल का घेता? असा सवाल विचारला होता. आता याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-पुणे महामार्गाबाबत कोर्टात धाव घेतली आहे. कोल्हापूर-पुणे हा महामार्ग अत्यंत निकृष्ट झालाय, जोपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नये, अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात केली.
Pune Crime : बंडू आंदेकरला मध्यरात्री पोलिसांनी इंगा दाखवला, नाना पेठेत आणलं अन्....कोल्हापूर आणि पुणे या दोन शहरादरम्यान २४० किमीचा महामार्ग असून तीन तासात पोहचणं अपेक्षित आहे. पण सध्या या महामार्गावर सध्या सात तासांचा वेळ लागतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होतं, तो वेगळाच भाग आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात. हा मुद्दा लक्षात घेऊनच राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. मंगळवारी याबाबत सुनावणी झाली. कोर्टाने पुढील सुनावणीवेळी प्राधिकरणासह सर्व विभागांना हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. कोर्टाने हस्तक्षेप केल्यास कोल्हापूर-पुणे हा रस्ता टोलमुक्त होण्याची शक्यता आहे.
Maratha Reservation : १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल