महिलांसाठी दोन कार्यशाळा
esakal September 13, 2025 03:45 AM

बाया कर्वे इन्स्टिट्यूटतर्फे
महिलांसाठी कार्यशाळा
रत्नागिरी, ता. १२ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे मारुती मंदिर येथे नवरात्रोत्सवाची रंगत वाढवण्यासाठी महिलांसाठी व तरुणींकरिता विशेष दोन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
पहिली कार्यशाळा १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान दुपारी २:३० ते ५:३० वेळेत होईल. यात नवीन, जुन्या साड्यांपासून घागरा चोली शिकवण्यात येईल तसेच हॅन्डमेड ज्वेलरी बनवणे, गरबा मेकअप शिकणे व टिप्स दिल्या जातील. २० सप्टेंबरला दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळा होणार आहे. यात उपवासाचे ९ पदार्थ-साबुदाणा ट्रेन्गल, उपवास इडली, अकॉर्डियन फ्राईज, साबुदाणा सँडविच, उपवास पॉपकॉर्न, पोटॅटो स्कीन फ्राईज आदी विविध नावीन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ बनवायला शिकवले जाणार आहेत. या कार्यशाळेसाठी अत्यल्प शुल्क आकारले जाणार असून, याला कोणतीही वयोमर्यादा नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.