कामशेत खिंडीत व्यावसायिकाला मारहाण करून एक लाखाची लूट
esakal September 13, 2025 06:45 AM

तळेगाव दाभाडे, ता. १२ : कामशेत खिंडीत मंगळवारी चार अनोळखी व्यक्तींनी एका व्यावसायिकाला अडवून मारहाण केली आणि त्याच्याकडील सुमारे एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी भालचंद्र लहू काटावडे (वय ४२, रा. अजिवली, मावळ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटावडे हे दुचाकीवरून कामशेत खिंडीतून जात असताना, चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांना दमदाटी करत मारहाण केली व त्यांच्या जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेतले. चोरट्यांनी एक लाख दोन हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कामशेत पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.