बीडच्या सरपंचाचा कारनामा! हवेत धाड धाड गोळ्या झाडल्या; घटना कॅमेऱ्यात कैद
Saam TV September 13, 2025 09:45 AM
  • बीडमधील रूई गावच्या सरपंचाचा वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार

  • एअरगनमधून गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • गावकऱ्यांचा संताप, पोलिसांची भीती उरली नाही का? असा सवाल

  • घटनेनंतर पोलिस कारवाईवर सर्वांचे लक्ष केंद्रित

बीडमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकरणामुळे पोलिसांच्या खाकीची भीती राहिली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रूई गावातील सरपंच यांनी एअरगनमधून हवेत गोळीबार केला. तसेच दशहत माजवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ त्यांनी वाढदिवसानिमित्त समाज माध्यमांमध्ये शेअर केला. गावकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. तर, दुसरीकडे गेवराई तालुक्यातील रूई गावातील सरपंचाचा प्रताप समोर आला आहे. त्यांनी एअरगनमधून हवेत गोळीबार केला आहे. सुरूवातीला त्यांना खांद्यावर घेण्यात आलं. नंतर हवेत गोळीबार करून त्यांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घट

त्यांनी हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ वाढदिवसानिमित्त सोशल मीडियात व्हायरल केला. या व्हिडिओवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरपंच हवेत गोळीबार करून गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गावकरी म्हणाले. या प्रकरणानंतर पोलिसांची काही वचक राहिली आहे की नाही? असा उपस्थित होत आहे.

दरम्यान, रूई गावातील सरपंचाचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करणार? हे पाहणं म्हत्वाचं ठरेल.

म्हाडाची बंपर लॉटरी, गोरेगावच्या रहिवाशांना जॅकपॉट लागणार; पुनर्विकास योजनेअंतर्गत घरे मिळणार

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीडच्या गेवराईतील शृंगारवाडीत सभा

मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आणि जीआर काढल्यानंतर लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या सर्वांचा धडाका बीडमध्ये पाहायला मिळत आहे. गेवराई मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांनी सभा घेतली. शृंगारवाडी येथे सभा असून, सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ओबीसी समाज बांधवांकडून थेट सरकारला इशारा देण्यात आला आहे. तात्काळ जीआर रद्द करा, अशी मागणी केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.