निगडी, ता. १२ : स्व. श्री. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निगडी-पुणे यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
किरण विद्यालय, सेक्टर २५, सिंधुनगर, निगडी प्राधिकरण येथे हे शिबिर पार पडले. यात १८० हून अधिक नागरिकांची तपासणी करून औषधी देण्यात आली. शिबिरात हाडांशी संबंधित आजार जसे फ्रॅक्चर, संधिवात, पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे विकार यांचे तपासणी व उपचार केले गेले. बीएमडीद्वारे हाडांच्या ठिसुळतेची तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला, तसेच प्रशिक्षित तज्ज्ञांकडून फिजिओथेरपी उपचाराची सुविधा देण्यात आली. याशिवाय सीबीसी रक्त तपासणी मोफत करून इतर रक्त तपासण्या अल्प दरात करण्यात आल्या.