आडूळ : लुखामसलाचे (ता. गेवराई) माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येचे धागेदोरे देवगाव फाटा येथील कुलस्वामिनी कला केंद्रासोबत जोडत आहेत. गुन्हा नोंद झालेली नर्तिका पूजा गायकवाड (वय २१) याच केंद्रावर अगोदर काम करत होती.
येथे ब्लॅकमेलिंगचे प्रकार सर्रास होत असल्याने लुटण्याचे ‘बाळकडू’ पूजाला येथूनच मिळाल्याचे समोर आले.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वादग्रस्त कुलस्वामिनी कला केंद्रात जाणाऱ्या अनेक ग्राहकांचे केंद्रात बारी लावून नर्तिकांसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ काही नर्तिकांनी ग्राहकांना न कळता काढलेले आहेत.
यातील अनेक व्हिडिओ या कला केंद्रावर पोलिसाचा छापा पडल्यानंतर व्हायरलही झाले आहेत. तर काहींना हेच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आणखी किती जणांचे बळी गेल्यावर हे बेकायदेशीर कला केंद्र बंद होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Maratha Reservation : गुलाल उधळूनच परतणारगुलाल उधळूनच परतणार - मनोज जरांगेकुलस्वामिनी कला केंद्रात सुरू असलेल्या प्रकाराबद्दल देवगावसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी आंदोलनकेले. मंत्रालयापर्यंत तक्रार दाखल केल्या. मात्र, कारवाई आणखीन गुलदत्यातच आहे. त्यामुळे आणखीन किती जणांचे जीव गेल्यानंतर कारवाई होणार?
- योगेश कोठूळे, सरपंच देवगाव