म्हाडा मोतीलाल नगर प्रकल्पात रहिवाशांना १६०० स्क्वे. फुटांचे आलिशान घर मिळणार.
गोरेगाव पश्चिमेत ३,७०० हून अधिक रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपणार.
मुंबईत छोट्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना हा प्रकल्प रहिवाशांसाठी जॅकपॉट.
भविष्यातील घरांच्या भाड्यामुळे रहिवाशांना आणि एजंट्सनाही मोठा आर्थिक फायदा.
मुंबईत स्वतःचं घर असावं, असे प्रत्येक सामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हीच त्याची सुरुवात आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना तब्बल १६०० स्क्वेअर फुटांचे आलिशान घर मिळणार असून, हा प्रकल्प सध्या प्रचंड चर्चेत आहे.
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरमधील१, २ आणि ३ या चाळी आता जुन्या झाल्या आहेत. ३,७०० हून अधिक रहिवासी नवीन घराच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, म्हाडा या चाळींचे पुनर्विकास करणार आहे. म्हाडाच्या या प्रकल्पामुळे गैरव्यवहाराची शक्यता नाही. ठरलेल्या वेळेत रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.
मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घटमुंबईकरांसाठी जॅकपॉट
मुंबईत आज घर घेणं सोपं नाही. घरांची किंमती गगनाला भिडले आहेत. आज ३०० ते ३५० स्क्वे. फुटांचे घर विकत घेणेही सर्वसामान्यांसाठी सध्या स्वप्नवत आहे. त्यामुळे बरेच जण विरार, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अबंरनाथ या भागांमध्ये अशा उपनगरांचा पर्याय निवडतात.
पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दरपण आता गोरेगावसारख्या प्राईम लोकेशनवर रहिवाशांना १६०० स्क्वे. फुटांचे नवे घर मिळणार आहे. यामुळे अनेकांचं आलिशान घरामध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अलिकडेच वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना ५०० स्क्वे. फुटांचे घर मिळाले होते. दरम्यान, आता मोतीलाल नगरच्या प्रकल्पातील रहिवाशांना त्याच्या तिप्पट घर मिळणार आहे.
धुळ्यात महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशी उचललं टोकाचं पाऊलगोरेगावमधील एका अनुभवी रिअल इस्टेट एजंटनं सांगितलं की, 'पुढील ७ ते ८ वर्षांत या घरांना किमान दोन ते अडीच लाख रूपये प्रति महिने भाडं मिळू शकेल. यामुळे रहिवाशांना चांगलाच फायदा होईल. तसेच एजंटनाही या व्यवहारातून चांगलेच कमिशन मिळेल'.
माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट