सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र
esakal September 13, 2025 12:45 AM

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनातील एक भाग झालं. अर्जुन-प्रियाची जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आलेंल पहायला मिळतय. सायली बाळाचा विचारात गुंगून गेलेलं मालिकेत दाखवण्यात आलंय. त्यामुळे सायली-अर्जुन आई-बाबा होणार का? अशी चर्चा होताना पहायला मिळतेय.

मालिकेत प्रिया तरुंगातून सुटून येते. परंतु सायली तिला हाताला पकडून घराबाहेर काढते. सायलीचं हे रुप पाहून प्रेक्षकांना प्रचंड धक्का बसतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीचे आईबाबा शोधण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळे तो शोध सुरुचं ठेवतो. सायलीला असं वाटतं की, अर्जुननं तिच्या आईबाबाचा शोध थांबवावा. तिच्याजवळ जी माणसं आहेत, त्यातच ती सुखी आहे असं ती म्हणते. अर्जुन देखील तिचं म्हणणं मान्य करतो, आणि म्हणतो की, 'तु जे म्हणशील ते वागेल. कधी तुला त्रास देईल असं वागणार नाही.' परंतु तो मनाशी पक्क करतो की, सायलीला तिच्या आई-वडिलांची भेट घडवून आणणारच.

तर दुसऱ्या भागात महिपत चाकू हातात घेऊन प्रियाच्या मागे लागतो. प्रिया स्वत: प्लॅन करुन महिपतला रुग्णालयात बोलावते. महिपतला पाहताच ती जोरजोरात वाचवण्याच्या विनवण्या करत असते. महिपत चाकू हल्ला करणार तेवढ्यात रुग्णालयात गोंधळ होतो आणि महिपत पळून जातो. प्रिया जवळ असलेल्या कात्रीने स्वत: दुखापत करुन घेते. सगळे पोलिस वगैरे पोहचल्यावर एकच गोंधळ करते. इकडे अश्विला फोन येतो आणि आश्विन हादरुन जातो. प्रियाला भेटण्यासाठी तो तातडीने निघतो. तो वकिलांसह तिथं पोहचतो. तिथं गेल्यावर त्याला समजतं की, महिपतने प्रियावर हल्ला केलाय. प्रिया त्याच्यासमोर रडून रडून कांगावा करते. हल्ला झाला त्यावेळी पोलिस तिथं नसल्याने अश्विन पोलिसांवर भडकतो. प्रियाने स्वत:च्या जीवावर जोखीम घालून हा प्लॅन केलेला असतो. त्याचा प्रियाला अभिमान सुद्धा वाटतो.

View this post on Instagram

A post shared by मराठी Television Information (@marathitvinfo_official)

आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलेलं दाखवण्यात आलं आहे. बाप्पाच्या विर्सजनानंतर अस्मिताच्या बाळाचा विषय सुरु असतो. त्यातच कल्पना आणि प्रताप सायल आणि अर्जुनला बाळाचा विचार करायला सांगतात. त्यानंतर सायलीच्या डोक्यातही बाळाचा विचार येयला लागतो. ती बाळाच्या विचारात गुंग होऊन जाते. ती अर्जुनला डबा देताना त्यात एक चिठ्ठी लिहते. ती चिठ्ठी तिने त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या वतीनं अर्जुनला लिहलेली असते. अर्जुनने बाळाचा विचार करावा अशा आशयाचं ते पत्र असतं.

त्यामुळे आता मालिकेत वेगळा ट्रॅक येणार का अशा चर्चा रंगत आहे. सायली- अर्जुन गुडन्युज देणार का? अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगताना पहायला मिळताय. सध्या सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा सुरुये. त्यामुळे या मालिकेत सायली- अर्जुन गुडन्युज देणार का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.