खेड शिवापूर, ता. १२ : गोगलवाडी फाटा (ता. हवेली) येथील पासलकर बिल्डिंगजवळ लॉक करून लावलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत रमेश हनुमंत लगस (वय ३२, रा. शिंदेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी १९ आॅगस्ट ते २४ आॅगस्ट या कालावधीमध्ये गोगलवाडी फाटा येथील पासलकर बिल्डिंगजवळ लावलेली त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम. एच. १२ क्यू.सी. ६७९१) चोरट्यांनी चोरुन नेल्याचे तक्रारी म्हटले आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मुंडे करत आहेत