शिकाऊ उमेदवारांसाठी ४३४ पदांची भरती
esakal September 14, 2025 04:45 AM

शिकाऊ उमेदवारांसाठी ४३४ पदांची भरती
परिवहन महामंडळ ; ३० पर्यंत अर्जाची मुदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायातंर्गत ४३४ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी रत्नागिरी विभागीय कार्यालयात ३० पर्यंत अर्ज सादर करावेत, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी www.https://apprenticeshipindia.org/ हे संकेतस्थळ असून, आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात द्यावयाचे आहेत. या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा आहे. ही भरतीप्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादींबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रकांना आहे. शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायाअंतर्गत यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफिजरेशन अँड एयर कडिशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २ ही पदे भरण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.