Explainer: चार्ली किर्कचा मृत्यू ट्रम्पसाठी मोठा धक्का का आहे? राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अशी बजावली होती भूमिका
Tv9 Marathi September 14, 2025 02:45 AM

अमेरिका जागतिक महासत्ता असली तरी मागच्या काही दिवसात घेतलेले निर्णय अंगलट येत असल्याचं दिसत आहे. खासकरून टॅरिफचा मुद्दा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. असं असताना अमेरिकेत पुन्हा का गन वॉयलेंसने डोकं वर काढलं आहे. युटा व्हॅली युनिवर्सिटीत एका कार्यक्रमात राइट विंग लीडर आणि टर्निंग पॉइंट युएसचे संस्थापक चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय किर्क यांची हत्या झाल्याने अमेरिकेत चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी होते. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2024 साली महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे किर्क यांच्या हत्येने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. 10 सप्टेंबर रोजी किर्क युटा व्हॅली युनिवर्सिटीत टर्निंग पॉइंट युएसएसच्या अमेरिकन कमबऐक टूरचा भाग म्हणून ‘प्रूव्ह मी राँग’ या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हाच ही घटना घडली.

चर्चा रंगली होती आणि चार्ली किर्क हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. एक प्रश्न यावेळी सामूहिक गोळीबार आणि ट्रान्सजेंडर लोकांबाबत होता. तेव्हा कर्क यांनी उत्तर दिलं की, खूप जास्त..! आणि पुढे काय बोलणार इतक्यात त्यांच्या मानेवर गोळी लागली. किर्क यांच्या मानेवर गोळी लागली आणि ते खूर्चीवर कोसळले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. किर्क यांना एका खासगी वाहनाने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर फक्त एक गोळी झाडण्यात आली होती. त्यातच त्यांचाबळी गेला. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्र हलली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, आरोपीला पोलिसांच्या ताब्यात आहे.

कोण आहे किर्क यांच्या हत्येचा आरोपी?

चार्ली किर्क यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला 33 तासांच्या आत अटक करण्यात आली. आरोपीचं नाव टायलर रॉबिन्सन असून तो 22 वर्षांचा आहे. आरोपींना गोळ्या झाडल्यानंतर तेथून पळ काढला होता. तसेच 400 किमी दूर पळून गेला होता.अधिकारी टायलर रॉबिन्सनने चार्ली कर्कवर गोळीबार का केला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉबिन्सनच्या नावावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. पण गेल्या काही दिवसात राजकारणात सक्रिय असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. रॉबिन्सन हा नोंदणीकृत मतदार आहे. पण त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तसेच 2024 राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदानही केले नव्हते.

चार्ली किर्क कोण होते?

चार्ली किर्क हे उजव्या विचारसरणीला मानणारे होते. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016 आणि 2024 निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होते. त्यांनी 2012 मध्ये टर्निंग पॉइंट युएएसची स्थापना केली होती. आपल्या विचारसरणींच्या लोकांची मोट बांधण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं होतं. या चळवळीतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चळवळीत 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थी सदस्य होते. तसेच किर्क यांचे सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्स वर्ग होता. ट्विटरवरच त्यांचे 53 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांचा रेडिओ शो द चार्ली किर्क हा दर महिन्यांला 5 लाखाहून अधिक लोक ऐकत होते.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

चार्ली किर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांची मदत डोनाल्ड ट्रम्प यांना झाली होती. 2024 राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत टर्निंग पॉइंट युएएस या संघटनेने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2020 राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जिथे फटका बसला तिथेच किर्क यांची जादू चालली होती. 2024 मध्ये या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचा 5 टक्के फरकाने विजय झाला होता. हा विजय खऱ्या अर्थाने किर्क यांच्या रणनितीमुळे झाला होता. कारण त्यांच्या प्रचार नीतिमुळेच तरुण आकर्षित झाले होते. चार्ली किर्क यांच्या एका वक्तव्याने 2024 निवडणुकीचं स्वरुप पालटलं होतं. कारण ट्रम्प विरुद्ध हॅरिस यांच्यातील लढाईल आध्यात्मिक स्वरुप प्राप्त झालं. जॉर्जियात झालेल्या रॅलीत किर्क यांनी डेमोक्रॅट्सचा देवाचा द्वेष करणारे म्हंटलं आणि निवडणुकीचं चित्र बदललं. त्यामुळे किर्क यांची हत्या झाल्याने ट्रम्प यांच्या प्रचार नीतिला धक्का बसला आहे.

चार्ली किर्क यांची संपत्ती किती?

चार्ली किर्क यांची संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. या कमाईत मोठा वाटा हा सार्वजनिक भाषणं, पॉडकास्ट आणि रेडिओ शोमधून होता. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येथे. टर्निंग पॉइंट यूएसए या संस्थेतून त्यांना 2020 मध्ये 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं वार्षिक उत्पन्न मिळालं होतं. एरिझोनामु्ये त्यांचं अलिशान घर असून त्याची 47.5 अमेरिकन डॉलर इतकी किंमत आहे. तर फ्लोरिडामध्ये त्यांचे काँडो होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.