अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावण्याचे वेगवेगळी कारणे अमेरिकेकडून सांगितले जात आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, अमेरिकेतील वाढती महागाई कमी करण्यासाठी टॅरिफ लावणे आवश्यक आहे. शिवाय इतर देशांच्या वस्तूपेक्षा अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंवर अधिक भर दिला जाईल. दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंमुळे अमेरिकेतील वस्तूंचे मार्केट कमी झाले. यासोबत भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर 70 टक्के निर्यात भारताची कमी झालीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्यांच्यावरच त्यांनी घेतलेला निर्णय महागात पडताना दिसत आहे. टॅरिफनंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू कमी झाल्या आहेत. हेच नाही तर अमेरिकेतील महागाई गगनाला पोहोचली आहे. अमेरिकेत बटाटे, दूध, चिकन यासह अनेक वस्तूंचे भाग गगणात पोहोचले असून हा अमेरिकेसाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल. या समस्येतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनापुढे उभा आहे.
अमेरिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीला ऑगस्ट महिन्याच्या डाटानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.9 टक्क्यांपेक्षा महागाई अधिक वाढलीये. चिकन आणि अंड्यांसारख्या घरगुती वस्तूंमध्ये वाढ झालीये. या महागाईमुळे अमेरिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाचा महिन्याचा खाण्यापिण्यावरील साधारणपणे कमीत कमी खर्च तब्बल 75,600 रूपये खर्च करावे लागत आहेत.
पुढेही यामध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेत मागील काही वर्षांमध्ये काही गोष्टींच्या किंमती या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. ब्रेड, अंडी, दूध यासारख्या वस्तूंचा यात समावेश आहे. एक डझन अंडे तब्बल 300 रूपयांना मिळत आहेत. पावकिलो चिकनचा भाव अमेरिकेत 175 झालाय. यासोबतच तांदूळ आणि बटाट्याचे भावही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. सध्याच्या घडीला अमेरिकेत दूध हे 350 लीटर मिळतंय. अमेरिकेतील महागाई सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावून अमेरिकेने स्वत:च्या पायावर दगड पाडून घेतल्याचे यावरून दिसतंय.