क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे. हा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसर्या बाजूला रविवारी टीम इंडियाचा आणखी एक सामना होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. मात्र हा सामना मेन्सचा न्सून वूमन्स टीमचा असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यात एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका असणार आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर या मालिकेत भारताचं नेतृ्त्व करणार आहे. तर एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघात होणाऱ्या पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.
वनडे सीरिजसाठी वूमन्स टीम इंडिया : प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, उमा छेत्री आणि सायली सातघरे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम: एलिसा हीली (कॅप्टन), फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वॉल, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिनेक्स, निकोल फाल्टम आणि चार्ली नॉट.