IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing 11? कोचने सर्वच सांगितलं
GH News September 14, 2025 03:12 AM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणार आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या तरी एकाच संघाचा विजय होईल. तर दुसर्‍या संघाला पराभूत व्हावं लागेल, हे स्पष्ट आहे. मात्र दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत. या सामन्यात भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सकूता लागून होती. टीम इंडियाचे असिस्टंट कोच रायन टेन डेस्काटे यांनी प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट दिली आहे.

रायन टेन डेस्काटे काय म्हणाले?

प्रत्येक सामन्याच्या एक दिवसआधी पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेला कर्णधार किंवा मुख्य प्रशिक्षक संबोधित करतात. तसेच कोचिंग स्टाफमधील सदस्यही या पत्रकार परिषदेला उपस्थित असतात. त्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात 13 सप्टेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत डेस्काटे यांनी प्लेइंग ईलेव्हनचा सस्पेन्स एका वाक्यातच संपवून टाकला. त्यामुळे भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? हे स्पष्ट झालं आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची कोणतीही योजना नसल्याचं डेस्काटे यांनी म्हटलं. टीम इंडियाने 10 सप्टेंबरला यूएईवर 9 विकेट्सने मात करत आशिया कप 2025 स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. विजयी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल न करण्याचा अलिखित नियम आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध यूएई विरूद्धच्या त्याच 11 शिलेदारांसह मैदानात उतरु शकते. मात्र ऐनवेळेस प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.  त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनबाबत काय फैसला करतात?  हे संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाल्यानंतरच समजेल.

दोन्ही संघ टॉप 2 मध्ये

दरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी या स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकलाय. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी मोठ्या फरकाने हे सामने जिंकलेत. भारताने यूएई तर पाकिस्तानने ओमान विरुद्ध विजय मिळवला आहे. या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाचा दोन्ही संघाना नेट रनरेटमध्ये तगडा फायदा झालाय. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट हा +10.483 असा आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा टीम इंडियाच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट +4.650 इतका आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.