आळेफाटा, ता. १३ : महिलांना स्वावलंबी बनविणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने राजुरी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने होतकरू व गरजू महिलांसाठी विशेष चारचाकी वाहन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चपखल असे चार शब्दांत हेडिंग हवे आहे.. अनेक पर्याय देणे...
ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या माजी सदस्य स्नेहल शेळके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक हाडवळे, सरपंच प्रिया हाडवळे,उपसरपंच माऊली शेळके, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके,एम.डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकीर चौगुले, गौरव घंगाळे, रूपाली औटी, सुप्रिया औटी, जयसिंग औटी, लक्ष्मण घंगाळे, हेमलता शिंदे, संगीता शेळके, संगीता हाडवळे, जी.के औटी, कारभारी औटी, अशोक हाडवळे, नंदकुमार हाडवळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. या प्रशिक्षणासाठी गावातील विविध वयोगटातील महिलांनी नावनोंदणी केली असून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षकांकडून आस्था सोशल फाउंडेशन यांचे मार्फत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संदीप ढोरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा शिंदे यांनी तर उपसरपंच माऊली शेळके यांनी आभार मानले.