येरमाळा : मराठा समाजाच्या महिलांचा अवमान करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संगीता वानखेडे हिच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्थित कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश भास्कर काळे यांनी दिलेल्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संगीता वानखेडे हिच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्हा नोंद केल्याने ठोस कारवाई केली नाही तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे संगीता वानखेडे वर कडक व ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मराठा क्रांती मोर्चाला दिले आहे.
चाकण पुणे येथील संगीता वानखेडे या महिलेने सोशल मीडियावर मराठा समाजाच्या महिलांची मुंबई आंदोलन दरम्यान बदनामी केली होती. यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने मराठा समाज एमआयडीसी पोलीस ठाणे भोसरी या ठिकाणी संगीता वानखेडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आला होता.
यावेळी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वानखेडे यांच्यावर पोलिसांनी कलम ३५६ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड मोठ्या नाराजी होती संगीता वानखेडे हिच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा असे मराठा समाजाचे म्हणने होते यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने महामोर्चा काढण्याचे इशारा देण्यात आला होता तसे महामोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनात संगीता वानखेडेवर दखलपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा अन्यथा मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावर लवकरच महामोर्चा काढला जाईल असे म्हटले होते मराठा क्रांती मोर्चाच्या या निवेदनाची दखल घेत पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी तातडीने पाच जणांच्या शिष्टमंडळास भेटीसाठी बोलावले या शिष्टमंडळात सतीश काळे प्रकाश जाधव वैभव जाधव सुनिता शिंदे वृषाली साठे नकुल भोईर यांचा समावेश होता यांच्या सोबत चर्चेत डॉ शिवाजी पवार यांनी सांगितले की पोलीस प्रशासन संगीता वानखेडेवर कडक कारवाई करण्यासाठी माननीय न्यायालयाकडून परवानगी घेतली असून आम्ही पुढील कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले,
शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे पुढील कारवाई काय करणार यांचे लेखी पत्र मागितले तेंव्हा तातडीने पोलीस प्रशासनाकडून शिष्टमंडळाला लेखी स्वरूपात काय कारवाई करणार हे पत्र देण्यात आले यामुळे पोलीस प्रशासनास कारवाई करण्यासाठी वेळ देण्यासाठी सदरचा महामोर्चा मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने तात्पुरता स्थगित करत आहोत असे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना देण्यात आले.