अनुसुचित जमाती समिती अध्यक्षांना दिले निवेदन
esakal September 14, 2025 07:45 PM

बसपाची पदोन्नतीसाठी पालिकेला निवेदन
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : पालिकेत अनुसुचित जमातीतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत बहुजन समाज पक्षाने अनुसूचित जमाती समिती अध्यक्षाचे लक्ष वेधले आहे. याबाबत बसपाचे माजी प्रदेश सचिव सुदाम गंगावणे यांनी अनुसूचित जमाती समिती अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांना निवेदन दिले आहे. सन २०२१ मध्ये शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेतून मुख्याध्यापकांची पदोन्नती झाली होती. परंतु, त्यानंतर जवळपास चार वर्षांपासून शिक्षण विभागाने आदिवासी शिक्षकांची पदोन्नती जाणीवपूर्वक रोखली आहे. आदिवासी शिक्षक असल्यानेच शिक्षण विभाग आणि पालिकेने जाणिवपूर्वक संविधानिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवले आहे. पालिका सामान्य प्रशासन अन्य समुहातील विभागातील कर्मचाऱ्यांची मात्र वेळोवेळी पदोन्नती करीत आहे.
याबाबत पालिकेच्या प्रशासनाला सतत पत्रव्यवहार करण्यात येतो. यासह इतर विषयाबाबत अनुसूचित जमाती आयोगाला बसपाच्या वतीने लेखी निवेदन देऊन अवगत करण्यात आलं असल्याची माहिती सुदाम गंगावणे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.