बार्शी - बार्शी न्यायालयात आयोजीत केलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीत ३७३ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले, दाखल पुर्व ३ हजार ४९८ असे ३ हजार ८७१ इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवून सुमारे अनुक्रमे २५ कोटी ९८ लाख ६३ हजार ७०३,दाखलपुर्व प्रकरणांत ८८ लाख ७७ हजार ५६९ रूपयांची वसुली झाली.
न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी असे ४ हजार ७४३ व दाखलपुर्व ७ हजार १४ असे ११ हजार ७५७ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार्शी तालुका विधी सेवा समिती,वकिल संघ यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतमध्ये प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांचे अध्यक्षतेखाली न्यायालयात ३७३ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले, दाखल पुर्व ३ हजार ४९८ असे ३ हजार ८७१ प्रकरणे तडजोडीने मिटवून सुमारे २५ कोटी ९८ लाख ६३ हजार ७०३, दाखलपुर्व प्रकरणांत ८८ लाख ७७ हजार ५६९ रूपयांची वसुली झाली.
न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी,फौजदारी ४ हजार ७४३, दाखलपुर्व ७ हजार १४ असे ११ हजार ७५७ प्रकरणे पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. सहा पॅनल करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे, जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकलपट्ट-रेड्डी, सह दिवाणी न्यायाधीश पी. बी. लोखंडे, श्रीमती पी. व्ही. राऊत, श्रीमती जी. एस. पाटील, श्रीमती एच. यु. पाटील यांचा समावेश होता.
मोटार अपघात प्रकरणांत सहा प्रकरणात तडजोडीने होऊन ५१ लाख ८ हजार रुपये रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. अॅक्ट १३८ च्या ३६ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होऊन २४ कोटी ३७ लाख ६० हजार ३७१ रूपयांची वसुली तर रक्कम वसुलीच्या १७ प्रकरणांत तडजोड होऊन १ कोटी ४ लाख ९३ हजार ८०९ रूपयांची वसुली झाली.
न्यायालयातील प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणांत चार प्रकरणे व कबुलीची २१६ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. २ लाख ८ हजार ३०० रूपयांची दंड वसूल करण्यात आला. पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये यशस्वीतेसाठी वकिल संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, नगरपरिषद, पंचायत समिती, वीजवितरण कंपनी यांचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.