वनडे मालिकेसाठी संघ जाहीर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघातून पत्ता कट
GH News September 15, 2025 12:13 AM

आशिया कप 2025 स्पर्धा सुरु असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळत आहे. जेतेपदासाठी भारतीय प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध रंगीत तालीम पार पडणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण या दोघांनी टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता फक्त वनडे मालिका खेळणार आहेत. अशा स्थितीत दोघांची ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या संघात नाव नसणं हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण दोघंही 9 मार्च 2025 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केल्यापासून दोघंही क्रिकेटपासून दूर आहेत.

बीसीसीआय निवड समितीने पहिल्या वनडेसाठी आणि दुसऱ्या-तिसऱ्या वनडेसाठी वेगळी टीम निवडली आहे. पहिल्या वनडे सामन्यात रजत पाटीदार कर्णधार असणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघात तिलक वर्मा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे. हे तिन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेचा भाग आहेत. तर दुसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधारपदाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर असणार आहे.

पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया ए : रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंह.

दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया : तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंह.

असं असेल सामन्यांचं वेळापत्रक

  • पहिला सामना 30 सप्टेंबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.
  • दुसरा सामना 3 ऑक्टोबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.
  • तिसरा सामना 5 ऑक्टोबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.