'जल्लोष २०२५' स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू
esakal September 14, 2025 09:45 PM

पिंपरी, ता.१३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्यातर्फे ‘जल्लोष २०२५-२६’ चे आयोजन केले आहे.
ही जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धा पिंपरीतील डी. वाय पाटील महाविद्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील, पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रमुख पाच गटांमधून २० कलाप्रकारांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या दिवशी ‘स्पॉट एन्ट्री’ ची सुविधा उपलब्ध आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक अभिजित कुलकर्णी, डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. रणजित पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नीता मोहिते, तसेच सांस्कृतिक समन्वयक डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.