Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी 'स्टाइल स्टेटमेंट' महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा
esakal September 15, 2025 11:45 AM

नवरात्री २०२५ मध्ये महिलांसाठी क्लासी स्टाइल स्टेटमेंट म्हणून विविध रंगांच्या साड्या आणि घागरा खूप लोकप्रिय ठरत आहेत. स्टेटमेंट ब्लाऊज आणि आरी वर्कच्या फॅशन ट्रेंडमध्ये पारंपरिक हस्तकलेला महत्त्व दिले जात आहे. साड्यांसाठी सिल्क, खादी कॉटन, बनारसी, कांजीवरम यांसारख्या फॅब्रिक्सची मागणी वाढली आहे.

पृथा वीर

navratri 2025 saree and ghagra fashion trends for women in nine colors: नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला. यावर्षी महिलांचा स्टेटमेंट ब्लाऊज आणि आरी वर्कवर भर आहे. फॅशन ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा हाताने विणलेल्या पारंपरिक कलाकुसरीला मागणी आहे; तसेही नवरात्रीचे नऊ दिवसही वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि घागरा यांना खुलवणारे ब्लाऊज यासाठी फॅशन एक्स्पर्ट सध्या व्यस्त आहेत. 

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नवरंगांचा ट्रेंड जोपासला जातो. फक्त महिला किंवा युवतीच नव्हे, तर पुरुषसुद्धा त्यांना शक्य झाले तर नऊ दिवस त्या-त्या नियोजित रंगांचे शर्ट घालतात. या ट्रेंडला पुढे नेताना नवरात्रीसाठी स्टेटमेंट ब्लाउजला मागणी वाढली. साडीच्या फॅब्रिकचा विचार करताना हाताने विणलेल्या साड्यांमध्ये सिल्कच्या साड्यांपासून, खादी कॉटन, सेमी पैठणी, कॉटन, सिल्क-कॉटन, बनारसी, कांजीवरम, टसर सिल्क, बांधणी, पोचमपल्ली, फुलकारी, म्हैसूर सिल्क, कलमकारी, रस्टिक लिननसारख्या कापडापासून बनवलेल्या साड्या ते रिसायकल मटेरिअलपासून बनवलेल्या साड्याही ट्रेंडमध्ये आहेत. 

पण, फक्त साड्याच नव्हे, तर ब्लाऊजवर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. यातच पारंपरिक हस्तकलेचे मोल ओळखले गेले, म्हणूनच साड्यांप्रमाणे ब्लाऊजवरही तितकीच मेहनत घेतली जाते. सध्याचा कंटेम्पररी ट्विस्ट म्हणजे सध्या क्लासी कट असलेले ब्लाऊज पाहायला मिळतात. हँड एम्ब्रॉयडरी असलेले हाय नेक ब्लाऊज आधुनिक टच देतात. स्टेटमेंट ब्लाऊज हे टॉकिंग ब्लाउज म्हणून ओळखले जातात. यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये कॉटन सिल्क ब्लाऊज सर्वाधिक चालते. ब्लाऊजच्या मागच्या बाजूस विशिष्ट शैलीत प्रिंट असलेले आणि सुंदर भरतकाम केलेले ब्लाऊज घातले जाते. यामुळे व्यक्तिमत्त्वाची वेगळीच छाप पडते. ऑर्गेनिक रंग वापरले जात असल्याने या ब्लाऊजचे बजेट वाढते. पण, रंग ठळक दिसतात. अशा ब्लाऊजसाठी कापड मिळते किंवा ऑनलाइन रेडीमेड ब्लाऊज मिळतात.

पट्टा-चित्र असलेले ब्लाऊज 

पट्टा-चित्र म्हणजे कापडावर किंवा पट्ट्यावर चित्र काढणे. १५ व्या शतकाच्या पूर्वीपासून ओडिशात या कलेची भरभराट झाली आहे. यात माती, दगड आणि खनिज रंगांचा वापर पट्ट्यावर रंगविण्यासाठी केला जातो. काळ्या साध्या सुती हँडलूम फॅब्रिकवर एक विषय किंवा शुभ चित्र-पट्टा चित्र ब्लाऊजवर मिळते. यात महाराणी ब्लाऊज, वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे असलेल्या मधुबनी ब्लाऊजचे पर्याय आहेत.

सध्या आरी वर्क व बोट नेक ब्लाऊजचा ट्रेंड जमत आहे. ब्लाऊजवर आरी वर्क करून घेण्यासाठी जवळपास दोन ते अडीच दिवस लागतात. पण, ब्लाऊज खूप सुंदर तयार होते. महागड्या साड्यांसाठीही आरी वर्कचा उपयोग होतो. ब्लाऊजवर तितकाच वेळ दिला जातो.

- प्रणाली देशमुख,

घागरा चोली कसा स्टाइल करावा नवरात्रीसाठी?

घागरा चोलीसाठी असिमेट्रिकल हेम, क्रॉप टॉप आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी वापरा, जे ट्रॅडिशनल आणि मॉडर्न ब्लेंड देतात आणि डँडिया डान्ससाठी आरामदायक असतात. 2 sources

साड्या कशा निवडाव्या क्लासी लुकसाठी नवरात्री २०२५?

साड्यांसाठी ब्रेथेबल सिल्क किंवा कॉटन फॅब्रिक्स निवडा, ज्यात गोटा आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी असावी, आणि डेली कलर प्रमाणे मॅच करा जसे लाल पहिल्या दिवशी.

नवरात्रीत ज्वेलरी आणि अॅक्सेसरीज काय वापरावे?

ऑक्सिडाइज्ड सिल्वर ज्वेलरी, पर्ल्स आणि मिनिमल डिझाइनर ज्वेलरी वापरा, जी घागरा किंवा साडीशी मॅच होईल आणि गार्बा नाइट्समध्ये चमक देईल.

साड्या कशा निवडाव्या क्लासी लुकसाठी नवरात्री २०२५?

साड्यांसाठी ब्रेथेबल सिल्क किंवा कॉटन फॅब्रिक्स निवडा, ज्यात गोटा आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी असावी, आणि डेली कलर प्रमाणे मॅच करा जसे लाल पहिल्या दिवशी.

नवरात्रीत ज्वेलरी आणि अॅक्सेसरीज काय वापरावे?

ऑक्सिडाइज्ड सिल्वर ज्वेलरी, पर्ल्स आणि मिनिमल डिझाइनर ज्वेलरी वापरा, जी घागरा किंवा साडीशी मॅच होईल आणि गार्बा नाइट्समध्ये चमक देईल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.