निलंगा : मुलांच्या शिक्षणासाठी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दादगी येथील शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (वय ३२) यांनी शनिवारी (ता.१३) रात्री सातला विजेच्या तारेला स्पर्श करत आत्महत्या केली.
जातीचे प्रमाणपत्र अन् वैधता सुलभतेने द्या, मयताच्या वारसांना आर्थिक मदत करा, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसह नातेवाईक व समाजाचा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी ता. सहा रोजी तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले.
मयत शिवाजी मेळ्ळे एक वर्षापूर्वी दोन्ही मुलांचे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी दि. १३ रोजी सायंकाळी सात वाजता विजेच्या करंटाला धरून त्यांनी आपले जिवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी मायाताच्या नातेवाईकांसह शेकडो महिला पुरुष समाज बांधवांनी तब्बल सहा तास ठिय्या मांडत मायाताच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, मयताच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळावी, निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा मराठवाड्यातील जातीचे प्रमाणपत्र व वैधता सुरळीतपणे मिळावी, मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे त्यामुळे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे सहा महिने साठी वैधतेची अट शिथिल करावी यासह विविध मागण्यासाठी ठिय्या मांडला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढूमे-पाटील यांच्यासह निलंगा उपविभागातील सर्वच पोलीस अधिकारी, सीआरपीएफचे जवान, यावेळी तैनात होते. त्यानंतर लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलन कर्त्यांच्या मागणीचे निवेदन घेत शासन स्तरावरील सर्व मागण्यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितल्यानंतर उपोषण कर्त्यांनी प्रेत ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र व वैधता मिळत नाहीत म्हणून मागणी व आंदोलन सुरू आहे. प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिष्यवृत्ती मिळत नाही. अनुसूचित जमातीचे आरक्षण असून काय उपयोग आहे, जात प्रमाणपत्र मिळत नाही त्यांची पडताळणी होत नाही असा गंभीर प्रश्न सध्या मराठवाड्यातील अनुसूचित जमाती पैकी कोळी महादेव जमातीचा निर्माण झाला आहे.
निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि समाजबांधवांनी केली आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिस यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
वर्षभरापूर्वी शिवाजी मेळ्ळे यांनी आपल्या मुलांसाठी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा नाकारल्या गेल्या. मजुरी करून घर चालवणाऱ्या या पित्याला लेकरांच्या भविष्यासाठी काळजी होती, आणि याच मानसिक तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
Stray Dog Attack: 'साताऱ्यात पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा सहा जणांना चावा'; गोडोलीतील घटना, पालिकेचे जाणूनबुजून दुर्लक्ष?प्राथमिक पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपञ देण्याचा नियम व कायदा असताना संबधित उपविभागीय अधिका-याकडून जाचक अटी लावून जात प्रमाणपञ देण्यास टाळाटाळ करत आहे. मेळ्ळे यांची मुलगी सहावीला तर मुलगा चौथीला आहे. एक वर्षापूर्वी दोन्ही मुलांचे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने ते अस्वस्थ होते.