Agricultural News : 'नाफेड'च्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात
esakal September 15, 2025 02:45 PM

नाशिक: नाफेड’ने २४ रुपये दराने खुल्या बाजारात कांदा विक्रीला काढल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कांदा विक्रीवर परिणाम होऊन भाव दररोज घसरत चालले आहेत. विंचूर येथे व्यापाऱ्यांनी मनमानी करीत अवघ्या सेकंदात भाव बदलल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गावर पाऊण तास ‘रास्ता रोको’ केला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक वाढू लागला आहे. साठविलेल्या कांद्याला दर मिळत नसल्याने तो बाजारात नेण्यापेक्षा शेतकरी उकिरड्यावर फेकणे पसंत करत आहेत. विंचूर येथील लिलाव सुरळीत झाले.

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मात्र भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने नाफेडने कांदा खरेदी केल्यानंतरही भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठविलेला कांदा आता विक्रीस येत आहे. दुसरीकडे नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी काढला आहे. यामुळे सध्या होत असलेल्या कांदाविक्रीला फटका बसत चालला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी कमी दराने खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.