दिलीप दखणे
वडिगोद्री : अंतरवाली सराटी विभागात शनिवारी ता.13 रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मांगणी , सुखी, लेंडी नदीला पाणी आले या पावसामुळे भागातील शेतातील पीकांचे मोठ नुकसान झाले.
या ठिकाणी शनिवारी चार वाजेपासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत अतिशय जोरदार पाऊस पडत होता. अंतरवाली सराटी, नालेवाडी भांबेरी या ठिकाणी मांगणी नदी गेली आहे या नदीला पुर आल्याने नालेवाडी गावात पुराचे पाणी शिरले गावातील मंदीरात पाणी साचले होते.
या ठिकाणी मांगणी नदी काठी लाकडे तोडुन कोळसा तयार करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील गाव ..सापोली ता.पेन जिल्हा रायगड एकुण 10..मानस नवनाथ हिलम तुळशीराम पवार यशंवत पवार गणेश पवार नितेश वाघमारेनिशा हिलम लहान मुले....पारस हिलम ,आंकाशा वाघमारे हे रात्रभर नदीच्या पाण्यात अडकले होते सकाळी गावातील नागरिकांना याची माहिती मिळताच अंबड येथुन अग्निशामक ची गाडी बोलावुन पाण्यात अडकलेल्या दहा नागरीकांची सुटका केली.
या नागरीकांना अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वडीगोद्री चे मंडळ अधिकारी संदीप नरूटे, तलाठी, यांनी शाळेत राहण्याची व्यवस्था केली ,राशन मधुन धांन्य उपलब्ध करूण देण्यात आले.
Godavari Accident: गोदावरी नदीत पडून ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्यभागात अंतरवाली सराटी, नालेवाडी, वडीगोद्री, आदी ठिकाणच्या शेतात नदीचे पाणी शिरले , पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापुस, उस, फळबाग यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस पडला आहे पीकांचे नुकसान झाले आहे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकर्यांनी अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांच्याकडे केली आहे.