बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट निर्माती फराह खान सध्या युट्यूबमुळे जास्तच प्रसिद्ध झाल आहे. तने तिच्या शेफसोबत सुरु केलेलं युट्यूब चॅनल इतक लोकप्रिय झालं आहे की नेटकरी आता फराहच्या शेफचे फॅन झाले आहेत. ती तिच्या शेफ दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग करते. कधी स्वत:च्या घरी तर कधी सेलिब्रिटींच्या घरी. सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्वयंपाकाच्या व्लॉगमुळे जास्त चर्चेत आहे.ही जोडी आता प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या घरी एक व्लॉग शूट
या व्लॉगमध्ये फराह आणि दिलीपमधील मजेदार गप्पा चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. अलीकडेच, फराह आणि दिलीप दिल्लीला पोहोचले होते जिथे त्यांनी उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या घरी एक व्लॉग शूट केला. फराहने त्यांचे आलिशान घर देखील दाखवले. तसेच अश्नीरच्या आईकडून ताडाच्या पानांचे भजी आणि ब्रेड रोल बनवायला शिकले.
दिलीपने सांगितला सुरुवातीचा पगार
याच दरम्यान स्वयंपाक करताना दिलीपने त्याचा सुरुवातीचा पगार आणि आताचा पगार सांगिला आणि सर्वांना आश्चर्यच वाटल. तो पहिल्यांदा दिल्लीत कामावर यायचा तेव्हा त्याला फक्त 300 रुपये मिळायचे. तेव्हा फराहने लगेच यावर गंमतीने टोमणा मारला अन् म्हटलं की, “जेव्हा तू माझ्याकडे आलास तेव्हा तू थेट 20, 000 ने सुरुवात का केलीस?” यावर माधुरीने हसून उत्तर दिले, “कारण त्याला माहित होते की तू फराह खान आहेस.” फराह गमतीत पुढे म्हणाली की आता दिलीपचा पगार इतका वाढला आहे की सांगितला तर विश्वास बसणार नाही.
View this post on Instagram
A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)
दिलीप सर्वांपेक्षा जास्त कमाई करतो
दिलीप अनेकदा फराहशी व्लॉगमध्ये त्याचा पगार वाढवण्याबद्दल बोलताना दिसतो. श्रुती हासनच्या घरी शूट केलेल्या व्लॉगमध्ये, श्रुतीने विचारले होते की दिलीपला व्लॉगमधून अतिरिक्त पैसे किंवा वाटा मिळतो का? फराहने यावर सहमती दर्शविली आणि सांगितले की उलट दिलीप सर्वांपेक्षा जास्त कमाई करतो. फराहने असेही सांगितले की ती दिलीपच्या मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करते. तिने मुलांना इंग्रजी-माध्यमिक शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे आणि त्यापैकी एकाला क्यूलिनरी डिप्लोमा देखील मिळाला आहे.
वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी जाऊन दिलीपसोबत नवीन पदार्थ बनवायला शिकते
फराह खानने 2024 मध्ये तिचे स्वयंपाकाचे व्लॉग बनवण्यास सुरुवात केली. ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि दिलीपसोबत नवीन पदार्थ बनवायला शिकते. हलक्याफुलक्या गप्पा आणि मजेदार वातावरण हे या व्लॉगचे वैशिष्ट्य आहे. हळूहळू, दिलीप चाहत्यांमध्ये स्टार बनला आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे, फराह आणि दिलीपच्या जोडीला अलीकडेच 11 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या यूट्यूब फॅन फेस्टमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. व्लॉगमुळेच ही जोडी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांचे व्हिडीओ पाहायला चाहते देखील नक्कीच उत्सुक असतात.