सोलापूर: जगातील सर्वात उंच स्थानावरील अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे लडाख येथील ‘खार्दुंग ला चॅलेंज’ मॅरेथॉन स्पर्धा होय. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान १२ व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वाधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी ७२ किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरचे सुपुत्र ऑपरेशन सिंदूरमधील गरुडा कमांडो चंद्रशेखर अंबरकर यांनी ११ तासात हे अंतर पार करत ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे पुन्हा एकदा देशात सोलापूरचा लौकिक उंचावला आहे.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगाअतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत चंद्रशेखर यांनी दिलेल्या वेळेपूर्वी चार तास आधी हे आंतर पार करत एकप्रकारे विक्रमच केला आहे. सर्वाधिक उंचीवर ही स्पर्धा होत असल्याने याठिकाणी अत्यंत कमी ऑक्सिजन पातळी असते. त्यातच डोंगराळ प्रदेशामुळे ही स्पर्धा आव्हानात्मक मानली जाते. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही दिवस आधीच स्पर्धक लडाखला येत असतात. यामध्ये स्थानिक व आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असतो. लडाख येथील पर्यटन व संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
कमांडो चंद्रशेखर यांच्या या यशाबद्दल भारतीय सैन्य दलातर्फे त्यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला. चंद्रशेखर यांच्या या यशामुळे पुन्हा एकदा देशपातळीवर सोलापूरचे नाव अभिमानाने उंचावले आहे. चंद्रशेखर यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अभिमानाचे व आनंदाचे वातावरण आहे. सर्वस्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अन् ५० सेकंदात शर्यत पूर्ण करून नोंदवला विक्रम३९७५ मीटर उंच (१३,०४२ फूट) उंचीवरील खार्दुंग गावातून सुरू होणारी ही स्पर्धा खार्दुंगला पासच्या शिखरावरून (५३७० मीटर किंवा १७,६१८ फूट) पुढे जाते. यातील ६० किमीपेक्षा जास्त अंतर ४००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे, ज्यामुळे ही धावपटूंसाठी एक प्रचंड मोठी शारीरिक आणि मानसिक परीक्षा ठरते. अतिशय अवघड अशी समजली जाणाऱ्या या स्पर्धेचे अंतर पार करण्यासाठी एकूण १५ तासांचा कालावधी दिला जातो. २०१७ मध्ये, शब्बीर हुसैन यांनी ६ तास २३ मिनिटे ५० सेकंदात ही शर्यत पूर्ण करून विक्रम नोंदवला होता.
७२ किमी मॅरेथॉन स्पर्धेत यापूर्वीही प्रथममाउंट अबू येथे गत वर्षी पार पडलेल्या भारताच्या तिनही सैन्य दलांच्या सैनिकांसाठीच्या ७२ किमी मॅरेथॉन स्पर्धेतही चंद्रशेखर यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. ज्याठिकाणी ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबू नये अशी सूचना आहे, अशा ठिकाणी चंद्रशेखर यांनी ७२ किमी अंतर केवळ ११ तासात पार करून आपल्या उत्कट ध्येयवेडाचे व देशभक्तीचे उदाहरण देशातील नव्या पिढीसमोर ठेवले आहे.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासाचंद्रशेखर याने अतिशय अवघड समजली जाणारी मॅरेथॉन स्पर्धा चार तास आधीच पूर्ण करत त्याच्यातील जिद्द व चिवटपणा दाखवला आहे. त्याच्या आईला मात्र थोडी भीती वाटते. परंतु अशाप्रसंगी तोच आम्हाला धीर देत, काहीही काळजी करू नका असे सांगत असतो.
- रविकुमार अंबरकर, चंद्रशेखरचे वडील
त्याच्या या यशाबद्दल आई म्हणून मला त्याचा अभिमान अन् गर्व आहे.
- प्रतिभा अंबरकर, चंद्रशेखरची आई