Sexual Abuse Video : आपण नेहमीच म्हणतो की महिला, सशक्तीकरणाची गरज आहे. पण स्त्रीयांसोबत अशा हजारो घटना घट असतात ज्या आपले काळीज पिळवटून टाकतात. पण विकृत मानसिकतेचे अनेक लोक असेही म्हणतात की यात यात मुलींची चूक आहे, महिला अशा वागतात, तशा राहतात त्यामुळे त्यांच्यासोबत या घटना घडतात. पण नुकतीच एक अशी घटना घडली आहे जी विकृतीचा घाणेरडा चेहरा आपल्याला दाखवते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यासोबत अशी कॅपशन होती की, आणि आजही तुम्ही मुलींना दोष देता..!
एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेने लहान भावाला घेऊन जात असते. या रस्त्यावरील दुकाने बंद असलेली व्हिडिओत दिसत आहे. अचानक एक माणूस समोर येतो की त्या चिमूकलीला चुकीच्या पद्धतीने पकडतो, खेचून तिचे चुंबन घेतो आणि तिच्याशी अश्लील चाळे करतो. ही लहान मुलगी त्याला धक्का देते. मग तो माणूस निघून जातो. क्षणभर त्या चिमूकलीला कळतही नाही आपल्यासोबत काय झाले आहे.
फ्री 3D फोटो बनवा, एका क्लिकवर..View this post on InstagramA post shared by POSITIVE MINDSET (@mindset.25_)
मग एक लहान मुलगा सायकलवरून येतो आणि तिची विचारपूस करतो. तेव्हा ती त्याला घतला प्रकार सांगू लागते. हे सगळ ऐकून तिचा लहान भाऊ रडू लागतो. मग ती त्याला शांत करते आणि घरी जाऊया असे सांगते. ही इतक्या घाईत घडते की आपल्याला क्षणभर कळत नाही की नेमके काय घडले. ही घटना इतकी किळसवाणी आणि मनाला हादरून टाकणारी आहे. हा व्हिडिओ सोशल तूफान व्हायरल झाला आहे. यावर लाखो व्यू आणि कमेन्ट आल्या आहेत.
Retro स्टाइल फोटो बनवा एका क्लिकवर..पण या व्हिडिओतून एक गोष्ट सिद्ध झाली आहे, कोणताही नराधम स्त्रीकडे वासनेनेच बघतो मग ती बुरखा घातलेली असो, साडी नेसलेली असो किंवा फ्रॉक घातलेली चिमुकली असो. अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवणे आणि कडक कारवाई करत एक माणक स्थापित करणे गरजेचे आहे