"नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच
पनवेल शहर, कोळीवाडा,कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला, बंदर रोड
याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाचले होते.
पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी या ठिकाणी पाहणी करून पाणी उपसा करण्यासाठी मोठे पंप लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना पाण्यातून जाण्याचे टाळण्याचे आणि सुरक्षिततेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे."
Beed Live :केकाणवाडी पाझर तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसानबीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसात केकाणवाडी पाझर तलाव फुटून तलावाखालच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Jalgaon Live : सातगाव डोंगरी या भागात ढगफुटीसदृश पाऊसजळगावच्या पाचोर्यातील सातगाव डोंगरी या भागात घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बाम्हणे व दगडी नदीला पुर आल्याने पाऊसाचे पाणी डोंगरमाथ्यावरून सातगाव डोंगरी येथील नदीतुन धरणात घुसले धरण १००टक्के भरले तर दोन्ही नद्यांच्या संगमावर जास्त पाऊस झाल्यामुळे धरणालगतच्या गावात हेक्षपाणी शिरल्याने असंख्य कुटुंबाचे संसार उपयोगी वस्तू पाण्यात भिजवून घराब झाल्याने असंख्य कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे.
Solapur Live : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर"या सरकारने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे. हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही." असं वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये सांगितलं.
Nashik Live : 'हैदराबाद गॅझेट'वर सुप्रिया सुळे यांचा सवाल, 'कुणाला किती आरक्षण मिळाले, कुणीतरी सांगा'मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण, कुणाला किती आरक्षण मिळाले, कुणाला प्रमाणपत्र मिळणार, हे मला कुणीतरी समजून सांगावे, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, की समाजात वाढत चाललेली कटुता थांबली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, की सर्वपक्षीय बैठक बोलवा किंवा पाच दिवसांचे अधिवेशन बोलवा. यावर चर्चा करा अशी मागणी केल्याचे सांगितले.
Nagpur Live : नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलंनागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसाच्या सरीमुळे अनेक भागांत साचलं पाणी..
पाण्याचा निचरा न झाल्याने साचले पाणी...
शहरात अनेक भागातील रस्त्यावर पाणी, सिव्हिल लाईन परिसरात बाल भारतीच्या कार्यालयात समोर रस्त्यावर साचले पाणी...
दुचाकी धारकांना वाहन काढताना झाला त्रास...
Latur Live : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी छावा संघटनेचा रस्ता रोको आंदोलनराज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम वितरित करा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने, लातूर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. दरम्यान शासनाकडून मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.
Mumbai Live: घाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपलीघाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली
काल रात्री राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या भाविका हिरेन दामा आणि कोरम भानुशाली, अनिकेत बनसोडे यांना उद्या पर्यंत पोलीस कोठडी
गुन्ह्यातील कलमे वाढणार
अपघातग्रस्त मयताची अजून ही ओळख पटलेली नाही
Maharashtra Rain Update: जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवलापाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे १८ दरवाजे एक फूटाने उघडले असून, १८ हजार ८६४ क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Puja Khedkar Live: ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणामुळे खळबळ; पूजा खेडकरच्या घरी पोलिस दाखलपुण्यात पूजा खेडकरच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. बंद गेट पार करून अधिकारी थेट बंगल्यात गेले. पोलिसांनी लावलेली नोटीस फाडल्याची माहिती मिळाली आहे. नवी मुंबईत ट्रक क्लिनरच्या अपहरणाच्या प्रकरणाशी संबंधित कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच चौकशीदरम्यान खेडकर कुटुंबाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची पोलिसांनी नोंद केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Rain: संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर; जनजीवन विस्कळीतसंभीजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील पूर्णा नदीला पूर आला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटनंद्रा चारनेर परिसरात अधिक पाऊस झाल्याने नदी दुधाडी वाहत आहे. तसेच पिंपळगाव पेठ गणेशवाडीहून नदी पात्रातून जाण्यासाठी पुलाचे काम गेल्या २० वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे बोरगाव कासारी गावांचा संपर्क तुटला आहे. या ग्रामस्थांना बोरगाव कासारीहून निल्लोडमार्गे सिल्लोडला येण्यासाठी साधारण १८ ते २० किमी जास्त अंतर पार करावे लागत आहे.
Pooja Khedkar Live: पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडली, पोलिसांकडून आई-वडिलांचाही शोध सुरूवादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरावर नवी मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीस फाडण्यात आली. नवी मुंबईमधून पुजाचे वडील दिलीप खेडकर यांनी ट्रकच्या हेल्परचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच पोलिसांवर आरेरावी करणाऱ्या आणि कुत्री अंगावर सोडणाऱ्या मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पण पुजाचे आई-वडिल अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह फरार झाले असून चतुश्रृंगी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
Maharashtra Rain Update: जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवलागोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. १८ दरवाजे एक फूट उघडले आहेत. १८ हजार ८६४ क्युसेक पाणी गोडा पात्रात.
Mumbai Live: मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढघाटकोपर ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली. रविवारी रात्रीच्या सुमारास राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी अटक केलेल्या भाविका हिरेन दामा आणि कोरम भानुशाली, अनिकेत बनसोडे यांचे गुन्ह्यातील कलमे वाढणार असून आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्त मयताची अजून ही ओळख पटलेली नाही, अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.
Mumbai Live: पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनचालकांची गैरसोय; नागरिकांना प्रशासनाचे आवाहननवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी या ठिकाणी पाहणी करून पाणी उपसा करण्यासाठी मोठे पंप लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना पाण्यातून जाण्याचे टाळण्याचे आणि सुरक्षिततेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Pune Rain Live: पुण्यात पावसाचा हाहाकार! भिडे पुल पाण्याखाली, वाहतुकही बंदआज सकाळपासून मुळा मुठा नदीमध्ये खडकवासला धरणातून 30 हजार क्युसेक पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पुल पाण्याखाली गेला असून नदी पात्रातील दोन्ही बाजूची वाहतूक आता बंद करण्यात आली आहे. तसेच अजूनही धरणातून विसर्ग केला जाणार असून नदीकाठच्या लोकांना पुणे महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Solapur Rain Live: सोलापूरमध्ये पावसाची मुसळधार! पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीतकरमाळा तालुक्यातील कोर्टी येथे मुसळधार पाऊस झाला असून पावसाचे पाणी कोर्टी गावात शिरले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय अष्टभुजा देवी मंदिर व परिसरातील दुकाने पाण्याखाली गेली आहेत. यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
Pune Live : पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातील सुमारे ७० किलो चांदी चोरीला, तपास सुरूपुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील माणिक ज्वेलर्सच्या दुकानातून अंदाजे ६० ते ७० किलो चांदी आणि सुमारे ५ ते ६ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
Solapur Live : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखालीकरमाळा तालुक्यातील कोर्टी येथे मुसळधार पाऊस झाला असून पावसाचे पाणी कोर्टी गावात शिरले आहे त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय अष्टभुजा देवी मंदिर व परिसरातील दुकाने पाण्याखाली गेली आहेत.करमाळा तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे
Mumbai Live : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथसीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.त्यांनी शपथविधी आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Beed LiveUpdate: बंजारा समाजाच्या मोर्चावर पावसाच सावटबीड जिल्ह्यामध्ये आज बंजारा समाज बांधवांचा विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये लाखो बंजारा बांधव सहभागी होणार असून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाचे निवेदन शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Jalna LiveUpdate: जालन्यात बंजारा समाजाच्या मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरुवातहैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी जालन्यात आज बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा निघतोय.जालना शहरातील मस्तगड येथून मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून जालना शहरातील अंबड चौफुली येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा बांधवांची आहे.
Pune Rain LiveUpdate: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणारखडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे. सकाळी १० वाजता १४ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल आहे. मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवार पासून धरणक्षेत्रात ही पावसाची संततधार सुरू आहे.
Pune LiveUpdate: मुसळधार पावसामुळे वाघोली, केसनंद परिसर, आणि आळंदी महामार्गावर तलावाचे स्वरूप, वाहतुक कोंडीवाघोली :सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पुणे नगर महामार्गावर तसेच वाघोली व केसनंद परिसरात आणि आळंदी फाट्यावर महामार्गावर तलावाचे स्वरूप यामुळे मोठ्या प्रमाणात झाली वाहतूक कोंडी ही वाहतूक कोंडी सोडवताना वाघोलीचे पोलीस कर्मचारी होत आहे दमछाक.
Mumbai Live : आज सकाळ पासून मुंबई पूर्व उपनगरात पाऊस, जनजीवन विस्कळीतमुंबई सह उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे अशात मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुक पसरले आहे यामुळे यामुळे दृश्यमान देखील कमी झाले आहे याचा फटका रस्ते वाहतुकीला बसताना दिसत आहे यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील आढळून येत आहे
Pune Live : पुणे शहरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवातपुणे शहरात मुसळधार पाऊस सुरु असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हडपसर परिसरातील डीपी रोड वरती मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं आहे.
Maharashtra Live : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला10 वाजता खडकवासला धरणातून 14 हजार क्युसेक पाणी सोडणार. रात्री 12 पासून महापालिका प्रशासनाच्या टीम विविध ठिकाणी तैनात. पाऊस वाढण्याची शक्यता कमी, त्यामुळे सध्या तरी धोकादायक स्थिती नाही. काल सकाळी 8.30 ते आज सकाळी 8.30 या वेळेत शहरात 40 मिलिमीटर पावसाची नोंद. महापालिका प्रशासन पाटबंधारे विभागाच्या सतत संपर्कात.
Beed Live : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चामराठा समाजानंतर आता बंजारा समाज हे आक्रमक झाला असून बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यामध्ये विराट मोर्चाचे आयोजन केला आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
Pune Live : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यताआज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
Nashik News : मानसिक तणावातून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफासनाशिक : शरणपूर परिसरातील बारावीच्या विद्यार्थ्याने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून मानसिक तणावातून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. जयदीप किरण पाटील (वय १७, मूळ रा. आमडदे, ता. भडगाव, जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
Pune Rain : थेऊरमध्ये 50 घरांत शिरलं पाणी, घटनास्थळी एनडीआरएफ पथक दाखलपुणे : थेऊरमध्ये 50 घरामध्ये पाणी शिरलं असून घटनास्थळावर एनडीआरएफ पथक दाखल झालं आहे. अनेक घरे घर पाण्याखाली गेली आहेत. थेऊरसह धायरी आणि इंदापूरमध्येही मोठ्या प्रमाणात अनेक घरात पाणी शिरले आहे.
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार; लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीतमुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी पहाटे या पावसाचा जोर वाढला, त्यामुळे सध्या मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. यामुळे मुंबईची लाईफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर, हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पाच ते दहा मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे.
Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर, स्थानिक शाळा प्रशासनाचा निर्णयमुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरूखडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा 4697 क्युसेक वाढवून सकाळी 8.00 वाजता 7677 क्यूसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार, विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
Monsoon News : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; पश्चिम राजस्थानमधून घेतली माघारपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे उशिराने माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मॉन्सूनने यंदा तब्बल दोन महिने १६ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.
CM Devendra Fadnavis : प्राध्यापकांची ८० टक्के पदे त्वरित भरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीपुणे : राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे, ही बाब खरी आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून काही कार्यपद्धती सुचविण्यात आली होती. ही कार्यपद्धती पूर्ण झाली असून, नव्या केलेल्या बदलानुसार ८० टक्के पदे भरली जातील तसेच उर्वरित २० टक्के पदे भरण्यास आम्ही लवकरच मान्यता देऊ, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
Jammu and Kashmir News : दहशतवाद्यांना मदत करणारे तिघे अटकेतजम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूँचमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तीन जणांना शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याचा मोठा साठा बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी बंदी घालण्यात आलेल्या ‘हिज्बुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेला मदत करणारे असून, ते सीमावर्ती जिल्ह्यात दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. ‘‘तीन जणांना अटक करण्यात आली असून, एके-४७ रायफल्ससह युद्धसामग्रीचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे,’’ अशी माहिती जम्मू विभागाचे पोलिस महानिरीक्षक भीमसेन तुती यांनी केले.
Supreme Court : पोलिस ठाण्यांमधील अकार्यक्षम सीसीटीव्हीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनवी दिल्ली : पोलिस ठाण्यांमधील अकार्यक्षम सीसीटीव्ही प्रणालींबाबत जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. एका माध्यमामध्ये आलेल्या अहवालाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. न्या. विक्रमनाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. खंडपीठाने चार सप्टेंबर रोजी एका माध्यम अहवालाचा उल्लेख करत या वर्षी गेल्या सात-आठ महिन्यांत पोलिस कोठडीत ११ मृत्यू झाल्याची नोंद आहे, असे सांगितले होते.
PM Modi News : ‘‘भारतीय लष्कराच्या जवानांना पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला’’; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोपLatest Marathi Live Updates 15 September 2025 : ‘‘भारतीय लष्कराच्या जवानांना पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला,’’ असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. तसेच, घुसखोरी ही अत्यंत गंभीर समस्या बनली असून, देशात घुसखोरांना अजिबात थारा देणार नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले. तसेच सातारा येथे होणाऱ्या ‘९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पोलिस ठाण्यांमधील अकार्यक्षम सीसीटीव्ही प्रणालींबाबत जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ‘‘पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळणे ही देशाशी गद्दारी आहे,’’ अशी टीका आम आदमी पक्षाचे(आप) नेते अरविंद केजरीवाल केली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..