आशिया कप 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना 2 संघांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. दुबईत झालेल्या या सामन्यात हाँगकाँगने अनुभवी श्रीलंका टीमला चांगलाच घाम फोडला. श्रीलंकेने हा सामना जिंकला. मात्र हाँगकाँगने श्रीलंकेच्या नाकी नऊ आणले. हाँगकाँगने श्रीलंकेला चांगलंच झुंजवलं. हाँगकाँगने श्रीलंकेला सहजासहजी विजय मिळवून दिला नाही. हाँगकाँगने श्रीलंकेसमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 6 विकेट्स गमावून अवघ्या 7 बॉलआधी पूर्ण केलं. श्रीलंकेला विजयासाठी 18.5 ओव्हरपर्यंत संघर्ष करावा लागला. श्रीलंकेने 18.5 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे या मोहिमेतील आपला एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. तर हाँगकाँग या स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरली. मात्र हाँगकाँगने चाहत्यांची मनं जिंकली.
हाँगकाँगने श्रीलंकेला झुंजवलंकुसल मेंडीस आणि कामिल मिशारा हे दोघे आऊट झाल्याने श्रीलंकेचा स्कोअर 9.3 ओव्हरमध्ये 2 आऊट 62 असा झाला. कुसलने 11 आणि कामिलने 19 धावा केल्या. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेरा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर हाँगकाँगला ही जोडी फोडण्यात यश आलं. हाँगकाँगने श्रीलंकेला 119 धावांवर तिसरा झटका दिला. पाथुमने 44 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर कुसल परेरा आऊट झाला. श्रीलंकेने आणखी 3 धावा जोडल्या आणि आणखी एक विकेट गमावली. कॅप्टन चरिथ असलंका 2 रन्स करुन आऊट झाला.
हाँगकाँगने झटपट 3 झटके देत सामन्यात कमबॅक केलं आणि श्रीलंका बॅकफुटवर ढकललं. चरिथनंतर 127 धावांवर हाँगकाँगने श्रीलंकेला सहावा झटका दिला. कामिंदू मेंडीस 5 धावांवर आऊट झाला. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती 17.1 ओव्हरमध्ये 6 आऊट 127 रन्स अशी झाली. आता श्रीलंकेला 17 बॉलमध्ये 33 धावांची गरज होती. तर हाँगकाँगला 4 विकेट्स हव्या होत्या. मात्र दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा ही जोडी टिकून राहिली. या दोघांनी 1-2 धावा जोडल्या. तसेच संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करत श्रीलंकेला सलग दुसरा विजय मिळवून दिला.
श्रीलंकेने सामना जिंकला, हाँगकाँगने कामगिरीने मनं जिंकली
Sri Lanka edged past the line in Dubai, thanks to Pathum Nissanka’s knock and timely fireworks from the lower order 🇱🇰#SLvHK #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/CIlXxnl9uC
— AsianCricketCouncil (@ACCMedia1)
वानिंदूने 9 बॉलमध्ये नॉट आऊट 20 रन्स केल्या. वानिंदूने निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर दासूनने नाबाद 6 धावा केल्या. तर हाँगकाँगसाठी यासिम मुर्तझा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर आयुष शुक्ला, एहसान खान आणि एझाज खान या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.