91575
वासंती महाबळ यांचे निधन
सावंतवाडी,ता.१५ ः शिल्पग्राम येथील रहिवासी श्रीमती वासंती वसंत महाबळ (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, दोन जावई, एक मुलगा, सुन, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी येथील माजी गटशिक्षण अधिकारी कै. वसंत महाबळ यांच्या त्या पत्नी, माजी वनअधिकारी सुभाष पुराणीक यांच्या सासू होत.
----
91676
भास्कर राऊळ यांचे निधन
म्हापण, ता. १५ ः कुशेवाडा देऊळवाडी येथील रहिवासी, परुळे कुशेवाडा माजी सरपंच व परुळे येथील श्री देव वेतोबा देवस्थानचे मुख्य पुजारी भास्कर वामन राऊळ (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. परुळे कुशेवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.