दैवज्ञ पतसंस्थेला पुरस्कार
esakal September 16, 2025 06:45 PM

-rat१५p१२.jpg-
२५N९१६३०
नगर : दैवज्ञ पतसंस्थेला प्राप्त सर्वोत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना अध्यक्ष विजयराव पेडणेकर, अंजली पेडणेकर, रत्ना आचरेकर आदी.
-------------
दैवज्ञ पतसंस्थेचा सर्वोत्कृष्ट
पतसंस्था पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : येथील दैवज्ञ नागरी सहकारी पतसंस्थेला सर्वोत्कृष्ट पतसंस्थेचा संघर्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अध्यक्ष विजयराव पेडणेकर, सचिव रत्ना आचरेकर, संचालिका अंजली पेडणेकर व इतर संचालक उपस्थित होते.
सावेडी (जि. नगर) येथील माऊली संकुल येथे एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संदीप माळी, अॅड. प्रकाश साळवे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला. अॅड. साळवे यांनी विजयराव यांचे कौतुक करून या पुरस्काराबद्दल विशेष दखल घेतली. यापूर्वी दैवज्ञ नागरी सहकारी पतसंस्थेला ब्लू बॅंको रिबन प्रथम पुरस्कार, अध्यक्ष विजय पेडणेकर यांना अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पतसंस्थेच्या गौरवाबद्दल ठेवीदार, कर्जदार, पिग्मी प्रतिनिधी, कर्मचारी, संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.