दोन दिवसांत झाडपडीच्या १० घटना
esakal September 16, 2025 06:45 PM

शहरात पावसामुळे दोन दिवसांत १० ठिकाणी झाडे पडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत ती बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. काही झाडे घरांवर किंवा भिंतीवर पडली होती. ती झाडे जमिनीवर पूर्णपणे पडण्याच्या धोका असल्याने व त्यामुळे परिसरातून जाणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अर्धवट पडलेली झाडे पूर्णपणे बाजूला करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तत्काळ मदत कार्य काम सुरू केले. मुसळधार पाऊस सुरू असताना अर्धवट पडलेल्या झाडापासून नागरिकांनी सुरक्षित अंतर बाळगावे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.
-----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.