रिक्षा चोरीला
ठाणे, ता.१५ : चेंदणी शिवसेना शाखेजवळ उभी केलेली रिक्षा चोरीला गेली आहे. हा प्रकार १२ सप्टेंबर रोजी समोर आल्यावर रिक्षामालक आणि चालक यांनी दोन दिवस रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर रिक्षाचालक रवी ठाकूर (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.