‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल कायम स्वतःचं मत स्पष्टपणे मांडत असते. ज्या सिनेमात अभिनेत्री कायम करते, त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात बोलण्यास देखील अभिनेत्री मागे-पुढे पाहत नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत देखील अभिनेत्रीने धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘कहो ना… प्यार है’ सिनेमाला यश मिळालं. पण अभिनेत्रीला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही… ‘इंडस्ट्रीमध्ये माध्यासारख्या लोकांना दूर केलं जातं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अमीषा म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही गटातील असला तरी, प्रेक्षकांचं प्रेम सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.कारण मी कोणत्या खास गटात बसत नाही. मी दारू पीत नाही, मी सिगारेट ओढत नाही किंवा मी कोणाच्या मागेमागे फिरत नाही… आज मी जे काही कमावलं आहे, ते माझ्या कौशल्याच्या जोरावर कमावलं आहे… कारण काही लोकांना मी आवडत नाही आणि त्यांच्या मागेमागे मी फिरत नाही…’
स्वतःला आउटसायडर आहे असं सांगत अमीषा म्हणाली, ‘इंडस्ड्रीमध्ये राहणं तेव्हा कठिण होतं जेव्हा तुमचा कोणी बॉयफ्रेंड किंवा नवरा इंडस्ट्रीमधील नसेल. इंडस्ट्रीमध्ये तुमचं कोणी नसेल तर, झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणं फार अवघड असतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)
एवढंच नाही तर, अमीषा हिने सेलिब्रिटींबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. ’90 टक्के सेलिब्रिटी सोशल मीडियावर फॉलोअर्स विकत घेतात. एजन्सी सेलिब्रिटींसोबत संपर्क साधतात आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम मागतात. त्या बदल्यात, ते त्यांना लाखो फॉलोअर्स देण्याचे आश्वासन देतात. त्या एजन्सीने सर्वांसोबत संपर्क साधला आहे. अनेक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्सचा मोठा भाग पैसे देऊन विकत घेतला जातो…. ते खरे फॉलोअर्स नसतात. माझ्याकडून देखील अनेकदा पैसे मागण्यात आले. पण मी कधीच पैसे दिले नाहीत. मला माझे खरे चाहते आवडतात. मला विकत घेतलेले फॉलोअर्स नको आहेत…’
स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझं इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट खरं आहे. मी कधीच कोणतं फोटोशूट पोस्ट करत नाही. मी माझे जसे फोटो आहेत, तसे फोटो पोस्ट करते. कारण मी जशी आहे, तसंच राहायला मला आवडतं…’ असं देखील अमीषा पटेल म्हणाली.