काही लोकांना चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो. अशा वेळी चहानंतर होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिण्याचा पचनसंस्था, ॲसिडिटी आणि चयापचयावर वाईट परिणाम होतो. कारण चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन हे घटक असतात, जे ॲसिडिटी वाढवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल, तर त्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, चहा गरम असल्यास ॲसिड पातळी वाढते, पण पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड पातळी वाढत नाही.
आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागातील डॉ. सुभाष गिरी सांगतात की, रिकाम्या पोटी चहा पिण्यापूर्वी एक ग्लास साधे पाणी प्यायल्यास पाणी शरीरातील ॲसिड पातळ करू शकते. असे केल्याने चहातील कॅफिनचा परिणाम कमी होतो. त्यामुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते. मात्र, पाणी प्यायल्याने ॲसिडिटी पूर्णपणे दूर होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु रिकाम्या पोटी चहामुळे होणारी ॲसिडिटी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.
Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…
रिकाम्या पोटी चहापूर्वी काय खावे किंवा प्यावे?
-गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट्सच्या मते, ज्या लोकांना चहामुळे ॲसिडिटी होते, त्यांनी रिकाम्या पोटी सर्वप्रथम पाणी प्यावे.
-हवे तर कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटाचे पीएच पातळी संतुलित राहते.
-रिकाम्या पोटी चहा पिण्यापूर्वी हलका नाश्ता किंवा एखादे फळ खाऊ शकता. शक्यतो नाश्त्यानंतरच चहा प्यावा.
-ज्यांना ॲसिडिटीचा सर्वाधिक त्रास होतो, त्यांनी दूधाच्या चहाऐवजी हर्बल टी, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्यावी.
-शिवाय, शक्य असल्यास दूधाचा चहा दूधासोबत उकळू नये, तर ब्लॅक टी बनवून त्यात वरून गरम दूध मिसळून प्यावा.
फक्त पाणी पिणे पुरेसे आहे का?
पाणी पिण्याने आराम मिळू शकतो. परंतु जर तुम्ही दिवसभर तेलकट, मसालेदार किंवा जंक फूड खात राहिलात, कॅफिन घेत राहिलात, तर ॲसिडिटी पूर्णपणे दूर करणे कठीण आहे. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करा आणि जीवनशैली निरोगी ठेवण्यास सुरुवात करा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत)