पिंपरी, ता. १६ : सन २०२४ -२५ मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये सिटी प्राइड स्कूलचे पाच विद्यार्थी सीबीएसई गुणवत्ता यादीत झळकले.
पूर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये रावेत शाखेतील आदी सावणे ९१.९५ टक्के घेऊन राज्यात सातव्या क्रमांकावर, तर अर्जुन महेश जगदाळे ८८.५९ टक्के घेऊन बाराव्या क्रमांकावर आहे. मोशी शाखेतील अन्वी आहेर ८७.२५ टक्के घेऊन चौदाव्या क्रमांकावर, तसेच निगडी शाखेतील स्मृती नायर ८७.२५ टक्के घेऊन चौदाव्या क्रमांकावर आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये निगडी शाखेतील आर्णा मालेगांवकर ८७.८४ टक्के घेऊन राज्यात नवव्या क्रमांकावर आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व शाखेच्या प्राचार्यांकडून तसेच मार्गदर्शक शिक्षिकांकडून मार्गदर्शन लाभले. शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
---