भारत आणि पाकिस्तान सामना दुबईमध्ये रविवारी पार पडला. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. यापूर्वी, त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने यूएईला हरवले होते, तर पाकिस्तानने ओमानला हरवले होते. आशिया कप 2025 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
मैदानावर चौकार आणि षटकारांचा वर्षाव करणारा सूर्या फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही. खऱ्या आयुष्यातही त्याला महागड्या आणि आलिशान गाड्या खूप आवडतात. त्याच्या गॅरेजमध्ये अशा अनेक लक्झरी कार आहेत ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
सूर्य कुमार यादव यांच्या गॅरेजमधील पहिली कार मर्सिडीज GLS 400d आहे. त्यात 3.0-लिटर 6-सिलेंडर डिझेल इंजिन आहे जे 330 हॉर्सपॉवर आणि 700 Nm पीक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह एक स्पोर्टी 9G-TRONIC ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ट्रान्समिशन म्हणून काम करतो, जो चार चाकांना पॉवर देतो. यामुळे ते फक्त 6.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठते. सुर्यकुमार यादव अनेकदा या लक्झरी एसयूव्हीमध्ये प्रवास करताना पाहिले आहे. या कारची किंमत 1.37 कोटी रुपये आहे.
सूर्य कुमार यादव यांच्या कार कलेक्शनमधील पुढची कार टोयोटा वेलफायर आहे. ही लक्झरी एमपीव्हींपैकी एक आहे. यात 2.5 -लिटर इनलाइन फोर-सिलेंडर डीओएचसी सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इंजिन आहे जे कमाल 193 पीएस पॉवर आणि 240 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. त्याच वेळी हे हायब्रिड इंजिन 19.28 किमी/लिटर मायलेज देते. या कारची सुरुवातीची किंमत 1.22 कोटी रुपये आहे.
सूर्य कुमार यादव यांची सर्वात महागडी कार मर्सिडीज जी-वॅगन आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय लक्झरी ऑफ-रोडिंग एसयूव्हींपैकी एक आहे. जी-वॅगनमध्ये पॉवरफूल 4.0 -लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन आहे, जे 585 हॉर्सपॉवर आणि 850 एनएमची उत्कृष्ट पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक एएमजी स्पीड शिफ्ट ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे चारही चाकांना पॉवर देते. ही कार 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठते. या कारची सुरुवातीची किंमत 2.55 कोटी रुपये आहे.
सूर्य कुमार यादव यांच्या कार कलेक्शनमधील बीएमडब्ल्यू ३ जीटी ही एक कार आहे. 3 सिरीज ही या जर्मन कार ब्रँडची खूप लोकप्रिय रेंज आहे. बहुतेक लोक 3 सिरीज निवडतात कारण ती कामगिरी, तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये आणि परवडणारी किंमत यांच्यातील सर्वोत्तम पर्याय आहे. हे 2.0 -लिटर टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे जे 190 पीएस आणि 400 एनएमची जास्तीत जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. ते 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे मागील चाकांना पॉवर देते. या कारची सुरुवातीची किंमत 42.50 लाख रुपये आहे जी 47.70 लाख रुपयांपर्यंत जाते.
रेंज रोव्हर वेलार ही देखील सूर्यकुमारच्या कार कलेक्शनचा एक भाग आहे. तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 90 लाख आहे. ही एसयूव्ही 2.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये येते. डिझेल व्हर्जन फक्त 8.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते. त्याच वेळी पेट्रोल व्हर्जन 243 बीएचपी पॉवर जनरेट करते. या कारची सुरुवातीची किंमत 79.87 लाख रुपये आहे.