रॉयल एनफील्डने लाँच केली नवीन 350 सीसी बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
GH News September 17, 2025 05:15 PM

भारतीय बाजारपेठेत दर महिन्याला मोठ्या संख्येने दुचाकी विक्री केली जाते. यावेळी उत्पादक कंपन्या त्यांचे अनेक सेगमेंटमध्ये त्यांची उत्पादने लाँच करत असतात. अशातच बाईकमध्ये रॉयल एनफील्ड देखील अनेक सेगमेंटमध्ये विकली जाते. त्यात पुन्हा एकदा रॉयल एनफील्डने भारतीय बाजारात अपडेटेड मेटियर 350 ही बाईक लाँच केली आहे. बाईकची सुरुवातीची किंमत 1.96 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. ही बाईक पहिल्यांदा 2020 मध्ये लाँच करण्यात आली होती. आता ही बाईक पुन्हा एकदा मोठ्या अपडेटसह लाँच करण्यात आली असून या नवीन बाईकमध्ये तुम्हाल अपडेटेड डिझाइन आणि नवीन फिचर्ससह आणण्यात आली आहे.

लाँच झाल्यापासून, मेटीओर 350 ने जागतिक स्तरावर पाच लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करून एक मजबूत ग्राहक आधार निर्माण केला आहे. 2025 मेटीओर 350 फायरबॉल, स्टेलर, ऑरोरा आणि सुपरनोव्हा या चार प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. टॉप मॉडेल सुपरनोव्हा ब्लॅकची एक्स-शोरूम किंमत 2,15,883 आहे. ऑरोराची किंमत ₹2,06,290 आहे, तर स्टेलरची किंमत 2,03,419 रूपये इतकी आहे. तर या नवीन मेटीओर 350 रॉयल एनफील्ड बाईकची बुकिंग सुरू झाली आहे आणि डिलिव्हरी 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

मेटीओर 350 डिझाइन अपडेट्स

रॉयल एनफील्डने नवीन लाइन-अपला बाजारात जबरदस्त स्मार्ट दिसण्यासाठी रंग आणि डिटेलिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. सुपरनोव्हा मॉर्डन कलर पॅलेट आणि क्रोम डिटेलिंगसह येते. ही रॉयल एनफील्ड ऑरोरा व्हिंटेज रंगांमध्ये उपलब्ध आहे जे व्हिंटेज फील देते. स्टेलरमध्ये डार्क आणि सिंपल कलर्ससह एक साधी स्टाईल प्रदान करते. फायरबॉल अधिक रंग आणि एक वायब्रेंट लूक असलेल्या तरुण रायडर्सना लक्ष्य करते. हे बदल मोठे डिझाइन रीडिझाइन नाहीत, तर बाइक रिफ्रेश आणि ॲट्रक्टिव्ह दिसण्यासाठी अपडेट केलेले आहेत.

फिचर्स अपडेट

मेटीओर 350 चे बदल फिचर्समध्ये आहेत. फायरबॉल आणि स्टेलर आता मानक एलईडी हेडलॅम्प आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह येतात. ऑरोरा आणि सुपरनोव्हामध्ये ॲडजस्टेबल लीव्हर्स आहेत. सर्व प्रकारांमध्ये आता एलईडी इंडिकेटर, यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट आणि असिस्ट-अँड-स्लिप क्लच आहे. या सर्व सुधारणांमुळे बाईक शहरी प्रवासासाठी आणि लांब हायवे राईड्ससाठी अधिक आरामदायी बनते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.