आशिया कप 2025 स्पर्धेतील ग्रुप-ए मॅचदरम्यान 14 सप्टेंबर रोजी ( रविवारी) भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत 7 विकेट्सनी विजय मिळवला. मा्तर या सामन्यातील विजयाप्रमाणेच आणखीही एक गोष्ट सर्वांच्या लक्षात राहिली ती म्हणजे भारतय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी न केलेलं हस्तांदोलन.. मॅच सुरू होण्यापूर्वी टॉसच्या वेळेस कॅप्टन सूर्यकुमराने पाकिस्तानी कर्णधाराशी हँडशेक केल नाहीच आणि सामना जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडू हे पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवताच ड्रेसिंग रूममध्ये परत गेले.
मात्र यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड चांगलंच (PCB) चांगलंच संतापले आहे. याप्रकरणाची चक्रार त्यांनी थेट इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलकडे (ICC) केली आहे. पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि भारतीय खएळाडू यावर अद्याप शांत होते. आता मात्र BCCIने चुप्पी तोडली असून पाकड्यांना चांगलचं सुनावलं. आम्ही फक्त विजयाचं सेलिब्रेशन करतोय. गोंधळ घालणाऱ्यांकडे लक्ष देत नाही, असं म्हणत त्यांनी पाकड्यांना अनुल्लेखाने मारलं.
BCCIचं म्हणणं काय ?
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हँडशेक कॉन्ट्रोव्हर्सीवर मोठं विधान केलं आहे. प्रत्येकाचं लक्ष भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यावर असले पाहिजे, त्याच्याशी संबंधित वादावर नाही, असं ते म्हणाले. “मी एवढंच म्हणू शकतो की टीम इंडियाने एक उत्तम विजय मिळवला आहे. यापेक्षा जास्त काही नाही. यापेक्षा कमी काही नाही. बस्स. भारताने पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. इतर कोणत्याही देशाने जो गोंधळ माजवलाय, त्याकडे लक्ष द्यायला नको. त्यामुळे आपण अस्वस्थ होता कामा नये” असं आयएएनएसशी बोलताना साकिया म्हणाले.
“आपल्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. आम्हाला आशा आहे की या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत ही विजयी मालिका सुरू राहील.” असंही त्यांनी नमूद केलं. आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव यानेही यापूर्वी या विषयावर भाष्य केले होते.
आम्ही फक्त मॅच खेळायला आलो आहोत
रविवारच्या सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सने पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने आशिया कपच्या सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने या विषयावर आपले मत व्यक्त केले होते. आज आमचे सरकार आणि बीसीसीआय यांचं एकमत होतं. आम्ही इथे फक्त सामना खेळण्यासाठी आलो होतो. बाकी काही नाही असे त्याने नमूद केलं.
याप्रकरणी बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, हस्तांदोलन करण्यासंदर्भात कोणताही नियम नाही. जर तुम्ही नियमपुस्तिका (रूल बूक) वाचली तर, विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्याबद्दल असा कोणताही नियम नाही. हा फक्त संवादाचा एक प्रकार आहे. भारतीय संघाने या प्रकरणात काहीही चुकीचे केलेले नाही असं त्यांनी नमूद केलं.