Aayush Kumar Murder Case : आयुष कोमकरचा खून का झाला? सगळं बाहेर येणार, पोलिसांना मास्टरमाईंड सापडला; मोठी अपडेट समोर!
Tv9 Marathi September 17, 2025 07:45 PM

Aayush Komkar Murder Case : पुण्यात आयुष कोमकर हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या या हत्याकांडात टोळीयुद्ध असल्याचा दावा केला जातोय. मृत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठीच वनराज आंदेकर यांचे वडील बंडू आंदेकर यांनी आयुष कोमकरची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता या हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश आले असून भविष्यात या हत्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्ता आहे. पोलिसांच्या हाताला या प्रकरणातील कृष्णा आंदेकर हा आणखी एक आरोपी लागला असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन दिवसांची कोठडी सुनावली

आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर समर्थ पोलिसांना शरण आला आहे. या खून प्रकरणातील सर्व 13 आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कृष्णाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ह बाजू जाणून घेतल्यानंतर कृष्णा आंदेकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या दोन दिवसांच्या कालात पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. त्यामुळे त्याच्या चौकशीतून स्फोटक आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची सक्यता आहे.

प्लॅन कुठे रचला तेही शोधायचे आहे

त्यापूर्वी न्यायालयात कृष्णा आंदेकरला कोठडी देण्याची गरज नाही, अशी विनंती त्याच्या वकिलाने न्यायालयात केली. तर कृष्णा आंदेकरची कोठडी किती गरजेची आहे, याबाबत सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. कृष्णा आंदेकर याच्याकडे शस्त्र आहे. ते जप्त करायचे आहे. त्यांनी आयुष कोमकरच्या हत्येचा प्लॅन कुठे रचला तेही शोधायचे आहे. अमन पठाणला कृष्णाने शस्त्र पुरवले होते, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

शस्त्र कुठून आणले, शोध घ्यायचा आहे

तर या प्रकरणाचा तपास करायचा आहे. रोज तपासात नव्या गोष्टी समोर येत आहेत. आम्हाला तपासासाठी अजून वेळ हवा आहे. या प्रकरणात एकूण 13 आरोपी आहेत. यात कृष्णा आंदेकर हा मुख्य आरोपी आहे. त्यानेच शस्त्र पुरवले होते. हा आरोपी इतर आरोपींच्या संपर्कात होता. कृष्णाने जे शस्त्र पुरवले आहे ते कुठून आणले याचा शोध घ्यायचा आहे. इतर आरोपी आणि हा आरोपी एकत्र होते. फरार झाल्यानंतर ते कुठ होते याचाही तपास करायचा आहे. या सर्व आरोपींचा आर्थिक दृष्टीनेही तपास करायचा आहे. हे सगळे आरोपी एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि यांच्यातील दुवा हा कृष्णा आंदेकर होत, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयापुढे सांगितले.

…म्हणून मला कोठडीची गरज नाही

तर आरोपी कृष्णा आंदेकरने वकिलांमार्फत आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालो आहोत. मी सकाळी 10 वाजता कोर्टात हजर झालो आहे. मला कोठडीची आवश्यकता नाही. बाकी सगळे आरोपी कोठडीत आहेत. या प्रकरणात माझे नाव आल्याचे समजताच मी स्वत: हजर झालो. यांनी सगळा तपास केला आहे. त्यामुळे मला कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयापुढे सांगितले. न्यायालयाने मात्र कृष्णा आंदेकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.