नाशिक: जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ उपक्रमातून ‘आयआयटी’त प्रवेश मिळविलेल्या सहा ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील ‘नासा’ या जागतिक संशोधन व अंतराळ संस्थेला, तसेच अमेरिकेतील विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळाली आहे. हर्षल ढमाळे, डिंपल बागूल, आकांक्षा शेजवळ, वृषाली वाघमारे, मेघा डहाळे, जागृती शेवाळे अशी त्यांची नावे आहेत.
यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल आणि जागतिक ज्ञानाशी त्यांची थेट नाळ जुळेल. या दौऱ्यात विद्यार्थ्यांबरोबर जिल्हा परिषदेतील एक शिक्षकही सहभागी होणार असून, त्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.
Bacchu Kadu: शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लवकरच आंदोलन बच्चू कडूंचा इशारा, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावाविद्यार्थ्यांना अमेरिकेत जाऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता येईल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवतील. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जागतिक दर्जाचे यश मिळवू शकतात, हे या उपक्रमातून सिद्ध होईल.
- ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक