Google Gemini चा व्हायरल फोटो ट्रेंड फॉल करताय? मग स्वत:चे फोटो सुरक्षित कसे ठेवाल? वाचा एका क्लिकवर
esakal September 17, 2025 07:45 PM

Google Gemini viral saree trend photo safety tips: Google Gemini चा नॅनो बनाना AI साडी ट्रेंड सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्स आपल्या साध्या फोटोंना 90s बॉलीवुड स्टाइल साडी लूक देत आहेत, शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटिंगसह स्लायलिश फोटो जनरेट करत आहेत. हा ट्रेंड मजेदार वाटत असला, तरी यामुळे प्रायव्हसी धोकेही वाढले आहेत. एका महिलेच्या AI इमेजमध्ये तिच्या ओरिजिनल फोटोत नसलेला तीळ दिसल्याने डीपफेक आणि डेटा मिसयूजची भीती निर्माण झाली आहे. यामुळे स्वत:चे फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील ५ गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Photo Upload करताना काळजी

कोणतेही AI Tool वापरताना लक्षात ठेवा की अपलोड करत असलेला फोटो सुरक्षित असायला हवा. कारण त्याच्या आधारावर AI Tool फोटो तयार करते. यामुळे वैयक्तिक फोटो अपलोड करणे टाळा.

Metadeta काढून टाका

जेव्हा तुम्ही फोटो अपलोड करता तेव्हा त्यामधून Location Tags डिव्हाइसची माहिती काढून ठाका. यामुळे तुमची कोणतीही माहिती लीक होणार नाही.

Privacy Setting

जेव्हा तुम्ही एखादे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वापरता तेव्हा नेहमी Strong Password किंवा Setting मध्ये बदल करा. ज्यामुळे तुमची माहिती कोणी चोरू शकणार नाही. तसेच तुमच्या फोटोचा आणि माहितीची गैरवापर करू शकणार नाही.

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा Retained Copy

तुम्ही फोटो अपलोड करत असाल तर ओरिजनल फोटो किंवा प्रॉम्प्ट असू द्या. यामुळे तुमच्या फोटोचा गैरवापर करत असेल तक तुमच्या लक्षात येऊ शकेल.

Google Gemini चा व्हायरल साडी ट्रेंड म्हणजे काय?

Google Gemini Nano Banana AI टूल वापरून युजर्स सेल्फींना 90s बॉलीवुड स्टाइल साडी लूक देणारा हा व्हायरल इन्स्टाग्राम ट्रेंड आहे, ज्यामध्ये चिफॉन साड्या आणि गोल्डन आवर लाइटिंगसह फोटो तयार होतात.

या ट्रेंडमध्ये फोटो अपलोड करणे का धोकादायक आहे?

फोटो अपलोड केल्याने डीपफेक व्हिडिओ, फेक प्रोफाइल्स किंवा अनधिकृत डेटा वापराचा धोका आहे, जसे की एका युजरच्या AI इमेजमध्ये लपलेला मोल दिसणे, ज्यामुळे प्रायव्हसी आणि सायबर स्कॅम्सचा धोका वाढतो.

स्वतःचे फोटो सुरक्षित कसे ठेवावेत?

अधिकृत Gemini अॅप वापरा, सामान्य किंवा नॉन-पर्सनल इमेजेस अपलोड करा, प्रायव्हसी पॉलिसी वाचा, VPN वापरा आणि AI जनरेटेड इमेजेसची तपासणी करून बॅकअप ठेवा.

एक्सपर्ट्स कोणता इशारा देत आहेत?

IPS अधिकारी आणि सायबर एक्सपर्ट्स फेक साइट्स, फिशिंग स्कॅम्स आणि डेटा मिसयूजबाबत सावध करतात, कारण अपलोड केलेले फोटो AI ट्रेनिंग डेटासाठी किंवा बेकायदेशीर कामांसाठी वापरले जाऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.